रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर आसाम येथील धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय

प.पू. डॉ. आठवले यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम

 

१. ‘देवाच्याच घरी आले आहे’, असे वाटून ‘आश्रमातच रहावे’, असे वाटणे

‘मला आश्रमात आल्यावर ‘मी देवाच्याच घरी आले आहे. देवाने आम्हाला भक्तांच्या रूपात स्वीकारले आहे’, असे जाणवत होते. मला आश्रमातील वातावरण पाहून ‘येथेच रहावे’, असे वाटत होते. मला आश्रमात लावलेले प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. मला चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती यांच्याविषयी माहिती मिळाली.’

– सौ. शीला पटवा, बोनगाई गाव, आसाम

 

२. ‘जीवनात प्रथमच चांगल्या ठिकाणी आलो आहे’,
असे वाटणे आणि हिंदु धर्मासाठी जीवन समर्पित करण्याची इच्छा होणे

‘मला आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले. विश्‍वातील ‘चांगली शक्ती आणि वाईट शक्ती कशी असते’, हे लक्षात आले. ‘विश्‍वात वाईट शक्ती आहेत आणि त्या आमच्या जीवनात अडचणी निर्माण करतात; परंतु विश्‍वात चांगल्या शक्तीही आहेत’, याचा अनुभव आला.

आमचे दोष सुधारण्यासाठी उपाय मिळाले. मला ‘जीवनात प्रथमच आपण चांगल्या ठिकाणी आलो आहोत, जेथे वाईट शक्ती आक्रमण करू शकत नाही’, असे वाटले. मी हिंदु धर्मासाठी जीवन समर्पित करण्यासाठी सिद्ध आहे.’

– कुमार अमित वर्मन, धुवडी, आसाम

Leave a Comment