राष्ट्रीय गोसेवा परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या प्रदर्शनाला केंद्रीय कृषीराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली !

सनातन संस्थेच्या वतीनेही आयुर्वेदिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. याला केंद्रीयकृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली. ‘आपले कार्य चांगले आहे. आयुर्वेद प्रत्येक घरात जाणे आवश्यक आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला.

पुणे येथील एम्आयटीचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डॉ. पांडे यांनी आश्रमात झालेले दैवी पालट उत्सुकतेने पाहिले आणि ‘या संदर्भात कशा प्रकारे संशोधन करू शकतो’, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच अधिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्याच्या संदर्भात रुची दर्शवली. त्यांनी आश्रमातील व्यवस्थापन अतिशय आदर्श असल्याचे म्हटले.

समाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी अनुभवलेले प्रेम !

प्रसारमाध्यमांतून संस्था आणि समिती यांबद्दल काही जरी येत असले, तरी ‘जनमानसात अन् त्यातही अभिजन समाजात संस्था अन् समिती यांबद्दल किती प्रेम आहे’, याचा मला प्रत्यय आला.

सनातनची साधिका कु. मेघा चव्हाण यांच्याकडे आणि त्यांच्या छायाचित्राकडे बघून साधकांना जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांमागील आध्यात्मिक कारणे

सात्त्विक सुखासह साधनेमुळे प्राप्त होणा-या आनंदाचे तरंग जेव्हा अंतर्मनातून बाह्यमनापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील निरामय हास्याद्वारे ते व्यक्त होऊ लागतात.

कल्याण येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

कल्याण (प.) येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव श्री. नरेंद्र पवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

दक्षिण भारतात हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणारे विजयनगर साम्राज्य !

पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावून जनजागृती करण्यात आली.

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या वचनाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली प्रचीती !

हे प.पू. गुरुदेव, आपण दयेचे सागर आहात. मुंगीच्या पायांतील घुंगराचा ध्वनीही आपल्याला ऐकू येतो. आपण सर्वांच्या अंतर्यामी निरंतर वास करता. माझ्या दु:खी मनाची अवस्था आपण जाणली.

पखवाजवादनाचा (मृदंगवादनाचा) वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘पखवाज वाजवतांना प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक, यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट दिल्यावर रामायणाची आठवण येते ! – दुर्गेश परूळकर, संस्थापक, गीता अभ्यास मंडळ

वसिष्ठ ऋषींनी स्वयंशासित समाजाविषयी जे लिहिले आहे, ते मला सनातनच्या आश्रमात जाणवते, असे प्रतिपादन डोंबिवली येथील गीता अभ्यास मंडळाचे संस्थापक, लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी केले