भारतीय शास्त्रीय संगीताची निर्मिती आणि तिची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
मन सात्त्विक अवस्थेत असतांना मुखावाटे किंवा वाद्य वाजवल्याने प्रगट होणारा नाद सात्त्विक असतो. या सात्त्विक नादालाच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, असे संबोधले जाते. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना, म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना आहे.