महापुरासारख्या भीषण आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवा !
‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, तिसरे महायुद्ध अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाते आणि तिचे मनोधैर्यही खचते.