सनातन संस्थेच्या वतीने ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे गणेशोत्सवात फ्लेक्स आणि ग्रंथ, सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

माजी शिक्षणमंत्री श्रीमती अर्चना चिटणीस यांनी दिली भेट !

ब्रह्मपूर – राजपुरा येथील स्वामी विवेकानंद गणेश मंडळ येथे सनातन संस्थेच्या वतीने ४ ते ९ सप्टेंबर या कालावधीत फ्लेक्सप्रदर्शन, तसेच ग्रंथप्रदर्शन अन् सात्त्विक उत्पादन कक्ष लावण्यात आला होता. या प्रदर्शनाला समाजातून चांगला प्रतिसाद लाभला.

या प्रदर्शनास मध्यप्रदेशच्या माजी शिक्षणमंत्री श्रीमती अर्चना चिटणीस यांनी सदिच्छा भेट दिली.

‘सनातन संस्थेचे साधक पुष्कळ परिश्रमी आहेत आणि सनातनचे कार्य चांगले आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.

क्षणचित्रे

१. स्वामी विवेकानंद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हिंदुत्वनिष्ठ श्री. अमोल भगत आणि मंडळाच्या अन्य सदस्यांनी प्रदर्शन लावण्यास सहकार्य केले.

२. अनेक जण फ्लेक्स प्रदर्शन वाचून त्याचे छायाचित्र काढत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment