मुलांना घडवण्यासाठी पालकत्व आदर्श असणे आवश्यक ! – सौ. सुलभा तांबडे, सनातन संस्था

मुलांवर आदर्श संस्कार घडवण्यासाठी पालकांचे वर्तन नेहमीच आदर्श असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील पसायदान विद्यामंदिरामधील पालक मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे यांनी केले. ‘पसायदान शिक्षण संस्थे’च्या पसायदान विद्यामंदिर आणि पसायदान माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत २५ जुलै या दिवशी श्रावण मासारंभ मुहूर्तावर ‘शिक्षक पालक सहविचार सभे’चे आयोजन करण्यात आले होते.

आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे ! – श्री. धनराज विसपुते (महाराष्ट्र प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ, भाजप)

मी सनातन संस्थेला मागील २५ वर्षांपासून ओळखत आहे. जेव्हा देवद (पनवेल) येथे सनातनचा आश्रम बांधण्याचे काम चालू होते, तेव्हापासून आम्ही संस्थेचे कार्य बघत आहोत. आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे; कारण

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने कन्नूर आणि एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘२५.७.२०२५ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील…

सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !

चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.

कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2026)

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त अनुभवला सर्व योगांचा सुरेख संगम ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ….

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव यांच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सनातनच्या सद्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती !

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव आयोजित रौप्यमहोत्सवी ४ दिवसीय सोहळ्याचे १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्ह्यात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र ६०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर, खानापूर, येळ्ळूर, रामनगर या ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या तिन्ही महोत्सवांसाठी १ सहस्र ६०० जणांची उपस्थिती होती.

सनातन संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील समर्थनगर, सातारा परिसर, हर्सूल आणि रांजणगाव येथे एकूण ४ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.