‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या दत्त पालखीच्या माध्यमातून सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात श्री दत्तगुरूंचे आगमन !

पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे ६६ टक्के पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी ओवाळले आणि पुष्पहार अर्पण केला.

देहलीतील महत्त्वाचे चौक आणि प्रमुख रस्ते यांवर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आकर्षक फलक झळकण्यास प्रारंभ !

हा ‘शंखनाद’ संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल. देहलीतील हा साधना आणि संघटनशक्ती आगामी महोत्सवाला ऐतिहासिक उंचीवर नेईल.

युवा चित्रपट निर्माते ओम भारद्वाज यांची सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी होण्याची विशेष विनंती !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव माझ्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरील ! – ओम भारद्वाज

सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा मोठ्या राष्ट्रकार्याचा आरंभ ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये धर्माभिमानी हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘या महोत्सवाचा मुख्य विषय ‘सनातन राष्ट्र’ हा आहे. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून या कार्यक्रमाचा शंखनाद केला जात आहे.

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणाऱ्या सौ. माहेश्वरी सरनोबत (कोल्हापूर) यांचे युरोप मधील अत्यंत कठीण ‘आयर्नमॅन’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयश !

ही स्पर्धा मी केवळ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याच कृपेमुळे जिंकू शकले. ही स्पर्धा पूर्ण करतांना मी भारताचे प्रतिनिधित्व केले’, याचा मला अभिमान आहे.

विविध राज्यांतील मान्यवरांना देहली येथील सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’चे निमंत्रण !

देहली येथे १३ आणि १४ या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला विविध राज्यांतील मान्यवर आणि महनीय व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात अखंड हरिनाम दिंडीचे आगमन !

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात ग्रामस्‍थ मंडळाच्‍या वतीने काढण्‍यात येणार्‍या अखंड हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही आगमन झाले.

उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सूत्रे आचरणात आणा आणि ‘संत’ व्हा !

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

४.१२.२०२५ या दिवशी दत्त जयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

‘पॉक्सो कायद्या’तील सहमतीचे वय १६ वर्षे करण्याविषयी धर्मशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय विश्लेषण

‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण’ अर्थात् ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत सध्या १८ वर्षे वय असलेली सहमतीची कायदेशीर वयोमर्यादा न्यून करून १६ वर्षे करण्याच्या प्रस्तावावर सध्या सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने विचार चालू आहे. या संदर्भात केवळ कायदेशीर नव्हे, तर भारतीय धर्मशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र यांच्या आधारे चर्चा करणारा हा लेख आहे.