सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे

अमरावती येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून सौ. वसुधा बोंडे, डॉ. अनिल बोंडे आणि ध्यानमंदिराविषयी माहिती सांगतांना श्री. रोहित साळुंखे

रामनाथी (गोवा) – देशभरातील तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचे काम सनातन संस्था करते, असे गौरवोद्गार अमरावती येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिल्यावर काढले. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. वसुधा बोंडे, तसेच केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्रा’चे साहाय्यक व्यवस्थापक श्री. निखिल गुरव उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. रोहित साळुंखे यांनी त्यांना सनातनच्या आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी खासदार डॉ. बोंडे यांचा सत्कार केला.

हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान जीवनामध्ये शास्त्रीयदृष्ट्या प्रत्यक्षात उतरवायचे मार्गदर्शन करणारा आश्रम !

सत्काराच्या प्रसंगी डावीकडून पू. पृथ्वीराज हजारे, डॉ. अनिल बोंडे आणि सौ. वसुधा बोंडे

आश्रमाविषयी डॉ. बोंडे म्हणाले, ‘‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला आज येता येणे, हे माझे सौभाग्य आहे. मला या आश्रमामध्ये एक वेगळी अनुभूती प्राप्त झाली. सनातनचे संस्थापक गुरुदेव डॉ. जयंत आठवले यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या तपश्चर्येने पावन झालेला हा आश्रम आहे. सद्गुरु भक्तराज महाराजांच्या आशीर्वादाने निर्माण झालेला आश्रम आहे. समस्त हिंदूंना जागृत करण्याचे आणि हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान जीवनामध्ये शास्त्रीयदृष्ट्या प्रत्यक्षात कसे उतरवायचे ? याचे मार्गदर्शन करणारा हा आश्रम आहे. देशभरातील हिंदूंपर्यंत ज्ञानाचे प्रसारण करणे, तसेच त्यांना योग्य मार्ग दाखवणे, हेही या आश्रमाच्या माध्यमातून होते. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेशी जोडलेलो आहे. सनातनच्या उत्तुंग कार्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’’

डावीकडे श्री. निखिल गुरव यांचा सत्कार करतांना पू. पृथ्वीराज हजारे

अमरावती येथील लव्ह जिहादची घटना म्हणजे हिमनगाचे टोक ! – खासदार डॉ. अनिल बोंडे

अमरावती येथे नुकत्याच उघड झालेल्या लव्ह जिहादच्या घटनेविषयी ते म्हणाले की,

१. अमरावतीची ‘डेमोग्राफी’ (लोकसंख्या) पालटत चालली आहे. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार १४ टक्के असलेली अमरावती शहरातील मुसलमानांची लोकसंख्या आता २५ टक्क्यांवर पोचली आहे. कदाचित् ती त्यापेक्षाही अधिक असेल. त्यामुळे लँड (भूमी) जिहाद, लव्ह जिहाद, गोहत्या आदी घटना येथे मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळेच अशा सर्व घटनांचा प्रारंभ अमरावतीमधूनच होतो. वर्ष २०२२ मध्ये त्रिपुरामध्ये कुठेतरी मशीद जाळली गेली, तर त्याचा मोर्चा ‘रझा अकादमी’ने अमरावतीत काढला.

२. सध्या उघड झालेली हिंदु मुलींच्या अश्लील व्हिडिओच्या संदर्भातील घटना हे हिमनगाचे टोक आहे. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक जण त्यामध्ये गुंतलेले असतील. सरकार अशांना शोधण्याचे काम करत असून लवकरच सत्य बाहेर येईल. अशांपासून समस्त शहरवासीय, विशेषतः तरुणी यांनी सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment