रामनाथी (फोंडा, गोवा) – गुजरातमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजाला दिशा देणार्या) काजल हिंदुस्थानी यांनी १८ एप्रिल २०२६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका सौ. निशिगंधा नाफडे यांनी काजल हिंदुस्थानी यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र-धर्म कार्याची माहिती सांगितली.
Noted and energetic nationalist Kajal Hindustani (@kajal_jaihind) – a fearless voice of Dharma, relentlessly working to awaken society, protect Indian culture and religions, and advocate for Hindu human rights, paid a goodwill visit to Sanatan Ashram, #Ramnathi (#Goa).
During… pic.twitter.com/Fm8rM2MZXl
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) April 18, 2026
साधनेमुळे निर्माण झालेली ऊर्जा समष्टीसाठी उपयोगात आणावी ! – काजल हिंदुस्थानी
आश्रम आणि कार्य यांच्याविषयीची माहिती जाणून घेतल्यानंतर साधकांशी संवाद साधतांना काजल हिंदुस्थानी म्हणाल्या, ‘‘तुमच्या महान गुरूंमुळे तुमच्यामध्ये साधनेची ऊर्जा निर्माण झाली आहे. ही ऊर्जा समष्टीसाठी उपयोगात आणायला हवी. लव्ह जिहाद, तसेच इतरही माध्यमातून सध्या महिलांवर मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. त्याच्या प्रतिकारासाठी महिला वर्गानेच पुढे आले पाहिजे. महिलांमध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची उपजत क्षमता असते. या क्षमतेचा उपयोग दुष्प्रवृत्तीच्या विरोधात करण्याची वेळ आली आहे.’’
Watch Video Now…
🙏🏻 प्रखर हिन्दुत्वनिष्ठ श्रीमती काजल हिंदुस्तानीजी (@kajal_jaihind) की रामनाथी, गोवा स्थित सनातन संस्था के आश्रम को भेंट ! 🚩
Video Link : https://t.co/JjwnzpF4dp
🪷 आध्यात्मिक उन्नति एवं ‘#रामराज्य’ की निर्मिति हेतु सनातन संस्थाhttps://t.co/KQA6EViwo5
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) April 19, 2026
अहंकारविरहित आणि ईश्वराचे अधिष्ठान ठेवून कार्य करणे अपेक्षित !
कोणतेही कार्य करतांना ते अहंकारविरहित आणि ईश्वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे. ‘मी काहीच करत नाही, तर श्री महादेव आणि श्री लक्ष्मीमाता हेच माझ्याकडून कार्य करवून घेत आहेत. त्यामुळेच पुष्कळ विरोध होऊनही आणि माझ्या विरोधात अनेक तक्रारी होऊनही मी आज राष्ट्र-धर्मासाठी समर्पित भावाने कार्य करू शकत आहे, असेही त्या म्हणाल्या.
या वेळी त्यांनी ध्यानधारणेमुळे त्यांना आलेली श्री महादेवाच्या शक्तीची अनुभूतीही सांगितली. त्यांना डोकेदुखीचा एक दुर्धर आजार होता. अनेक औषधोपचार करूनही तो बरा होत नव्हता. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘एकदा मी ध्यान लावले, तेव्हा मला या आजारावरील उपाय माझ्या आतमध्येच आहे’, असे एक दैवी शक्ती सांगत असल्याचे जाणवले. नंतर मी ध्यानधारणेची ऊर्जा आजारावर उपचार करण्यासाठी उपयोगात आणली, तेव्हा हा आजार ९० टक्के उणावल्याचे मी अनुभवले. अजूनही जेव्हा आजार डोके वर काढतो, तेव्हा ध्यान लावून मी तो नियंत्रणात आणते.’’

सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !