संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे समाजजीवन अस्थिर झाले आहे.

नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य !

भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या  जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन

या फेरीसाठी सनातन संस्थेचे  धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानामुळे भारतभरातील हिंदूंमध्ये नवचैतन्य !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.

वाशी (नवी मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्षाचे आयोजन !

वाशी, नवी मुंबई येथे बीएएन्एम् बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते.

तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संवादिनीवादक (‘हार्मोनियम’वादक) सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.