कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय सहभागी

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडी

कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त कोल्हापूर येथे १२ मे या दिवशी २ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी चैतन्यमय वातावरणात हिंदू एकता दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, तसेच सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती.

Leave a Comment