कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा, सांगली, कराड (जिल्हा सातारा) आणि कर्नाटकातील जत्राट अन् संकेश्वर येथे ठिकठिकाणी प्रवचन घेणे, मंदिर स्वच्छता असे उपक्रम घेण्यात आले.

गोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता !

या अभियानाचा एक भाग म्हणून मथुरेतील श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली. ७ मे २०२२ या दिवशी झालेल्या या पवित्र कार्यात भक्तांनी उत्स्फूर्तपणे साहाय्य केले.

गोव्यातील २५ मंदिरांमध्ये सामूहिक गार्‍हाणे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि विश्वकल्याण यांसाठी गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

कु. मुग्धा वैशंपायन या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील अंतिम ५ गायकांपैकी एक आहेत.त्यांना ‘रायगड भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे.

अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा !

येथे शहरात ३ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन क्षमा मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकियांची क्षमा अद्याप मागितलेली नाही. पोप यांनी गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी गोव्यासह सर्वत्रच्या हिंदु नागरिकांनी केली पाहिजे.

नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

एका व्यक्तीने स्वतःहून सनातनच्या ग्रंथांविषयी विचारून ग्रंथ घेणे आणि त्या वेळी ‘गुरुदेवच आपल्याला योग्य त्या व्यक्तीकडे घेऊन जात आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे