सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान – ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे,

आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले

महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.

महाशिवरात्रीनिमित्त मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने शिवाशा इस्टेट कॉलनीतील शिवाशेस्वर महादेव मंदिर आणि गर्तेश्वर महादेव मंदिर या दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य पडताळणी !

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली.

रशिया-युक्रेन युद्ध आणि तिरंग्याचे मूल्य !

भारतीय संस्कृती ‘अर्थ’ या कल्पनेपेक्षा ‘जीवन’ या संकल्पनेला अधिक महत्त्व देत असल्याने भारताने दाखवलेली व्यावहारिकता जगासमोर नवीन वस्तूपाठ घालत आहे. जगभर भारतीय तिरंग्याचे वाढलेले मूल्य अनुभवले जात आहे. भारतीय तिरंगा असलेली वाहने सुरक्षितपणे युक्रेनमधून बाहेर पडत आहेत.

विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !

‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना ही साधनेची दोन अंगे आहेत. ती एकमेकांवर अवलंबून आहेत. व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे. जर व्यष्टी साधना अल्प असेल, तर त्याचा साधनेवर परिणाम होतो.

पनवेल येथील लिमये वाचनालयात ‘मराठी राजभाषादिन’ साजरा !

लिमये वाचनालय येथे ‘मराठी राजभाषादिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांनी ‘मराठी राजभाषादिनाचे महत्त्व’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यान दिले.

अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘Sanatan.org’ संकेतस्थळ !

‘शास्त्रीय परिभाषेत अध्यात्म, धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य’, या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रचारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे.