अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘Sanatan.org’ संकेतस्थळ !

अनुक्रमणिका

महाशिवरात्र (१.३.२०२२) या दिवशी असलेल्या
सनातन संस्थेच्या (नवीन स्वरूपातील) संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष २०१२ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभ हस्ते नव्या स्वरूपातील Sanatan.org या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

‘शास्त्रीय परिभाषेत अध्यात्म, धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य’, या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रचारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे.

१.३.२०२२ या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या कार्याचा आढावा पुढे दिला आहे.

 

१. संकेतस्थळाच्या वाचकसंख्येत सातत्याने वृद्धी होत असणे

संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकेतस्थळाला जगभरातील १८० हून अधिक देशांतील जिज्ञासू भेट देतात. वर्ष २०२१ मध्ये सरासरी १ लक्ष ६५ सहस्रांहून अधिक वाचकांनी प्रतिमास ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाला भेट दिली. सध्या हे संकेतस्थळ मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम् आणि नेपाळी, या नऊ भाषांमध्ये कार्यरत आहे.

 

२. अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन तत्परतेने करण्यात येणे

आतापर्यंत संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. ‘कर्मकांड, विविध व्रते, देवघर, पूजाविधी, प्रदक्षिणा, वास्तूशुद्धी, अग्निहोत्र, सूर्योपासना, पूर्वजांचा त्रास, श्राद्ध, अंत्यविधी, सुतक, वाईट शक्ती, ‘सुख आणि शांती मिळवण्यासाठी काय करावे ?’, तसेच कुलदेवता, नामजपातील अडथळे, आध्यात्मिक पातळी, गुरु करणे, गुरुबंधू’ आदी अध्यात्मातील अनेक अंगांविषयी जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्यांची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांना ४८ घंट्यांत उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. मागील वर्षभरात साधारण ३०० जिज्ञासूंनी आपल्या शंकांचे निरसन करवून घेतले.

 

३. संकेतस्थळावरील विविध विषयांवर लेख उपलब्ध असणे

संकेतस्थळावर ‘धर्म, धर्मग्रंथ, अध्यात्म, सोळा संस्कार, धार्मिक कृती, सण, उत्सव आणि व्रते, हिंदु देवता, तसेच ‘अध्यात्मातील अपसमज आणि त्यांचे खंडण’, ‘पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचे अंधानुकरण कसे टाळावे ?’ ‘भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणा’, ‘आयुर्वेद’, तसेच ‘घरच्या घरी लागवड मोहीम’ आदी विषयांवरील लेख उपलब्ध आहेत.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा, यश-अपयश, तसेच महामारीसारख्या विविध समस्या यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ लागते. यासाठीच संस्थेने ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गांतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून यशस्वी अन् आनंदी जीवन कसे जगावे ?’, याचा वस्तूपाठच लोकांना उपलब्ध करून दिला आहे. वाचक संकेतस्थळावरील माहिती वाचून कृती करण्यास उद्युक्त होतात आणि त्यानुसार आचरण करून त्यांना लाभ होत असल्याचे अभिप्रायांद्वारे आवर्जून कळवतात.

 

४. ‘सनातन पंचांग ॲप’, तसेच सनातनच्या विविध
‘ॲप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन पंचांगाच्या, तसेच सनातनच्या विविध ‘ॲन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस्’ या ‘ॲप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम् आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळे लाखो वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

 

५. सनातनच्या संकेतस्थळाची यू ट्यूब वाहिनी (Youtube Channel)

https://youtube.com/sanatansanstha यावर सनातन संस्थेचे सत्संग ‘अपलोड’ केले जातात. या वाहिनीची सदस्यसंख्या सध्या ३४ सहस्रांपेक्षा अधिक आहे.

 

६. जिज्ञासूंनी संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणे

२७८ जिज्ञासूंनी संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

 

७. Sanatan.org निर्मित Android आणि iOS ॲप्स

अ. Sanatan Sanstha Android : https://www.sanatan.org/android

अ १. Sanatan Sanstha iOS : https://www.sanatan.org/ios

आ. Sanatan Chaitanyavani Audio App : https://Sanatan.org/Chaitanyavani

इ. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh Android : https://www.sanatan.org/ganeshapp

इ १. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh iOS : https://www.sanatan.org/iosganeshapp

ई. Shraddh Rituals App Android : https://www.sanatan.org/shraddh-app

उ. Survival Guide App Android : https://www.sanatan.org/survival-guide-app

सनातन संस्थेच्या वतीने जिज्ञासूंसाठी प्रत्येक आठवड्याला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या ४ भाषांमध्ये ‘साधना संवाद’ हा ‘ऑनलाईन सत्संग’ घेतला जातो. जिज्ञासू सत्संगाला उपस्थित राहून साधनेविषयी शंकानिरसन करून घेऊन साधनेत पुढचे मार्गदर्शन घेऊ शकतात. http://events.sanatan.org/

 

या संकेतस्थळावरील ‘ऑनलाईन धर्मदान (डोनेशन)’ देण्याच्या सुविधेमुळे अनेक वाचकांनी या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभाग घेतला. आपणही या सुविधेद्वारे धर्मदान देऊन धर्मपुण्य वाढवू शकता. धर्मदान देण्यासाठी भेट द्याhttps://www.sanatan.org/en/donate

 

८. सनातन संस्थेचे संकेतस्थळ, तसेच इतर सामाजिक संकेतस्थळे यांच्या लिंक्स

१. संकेतस्थळ www.sanatan.org
२. टेलिग्राम https://t.me/SanatanSanstha
https://t.me/SSMarathi
https://t.me/SSGujarati
https://t.me/DharmaGranth
https://t.me/Telugu_SS
https://t.me/SS_Tamil
https://t.me/SSMalayalam
https://t.me/SSNepali
३. ट्विटर www.twitter.com/sanatansanstha
४. पिंटरेस्ट www.pinterest.com/sanatansanstha
५. यू ट्यूब www.youtube.com/sanatansanstha

 

८ अ. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाची ‘लिंक’ इतरांनाही पाठवून त्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश पोचवा !

संपूर्ण जगाला सध्या अध्यात्म आणि साधना यांविषयीच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनानुसार सनातन संस्था अध्यात्माविषयीचे ज्ञान जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोचवू शकत आहे. सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लेख वाचून तुम्हाला काही लाभ झाला असल्यास या संकेतस्थळाची, तसेच सामाजिक संकेतस्थळांची ‘लिंक’ तुमचे परिचित आणि कुटुंबीय यांना अवश्य पाठवा. ‘जे या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात आहेत, त्या सर्वांपर्यंत हा ज्ञानरूपी प्रकाश पोचू दे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘टेलिग्राम’, ‘ट्विटर’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

कृतज्ञता

‘हे श्रीकृष्णा, ‘तुझ्या कृपेनेच आम्हाला या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली. ही सेवा तूच आमच्याकडून करवून घेत आहेस. या सेवेच्या माध्यमातून तूच आमची साधना करवून घेत आहेस, तसेच आम्हाला घडवत आहेस’, याबद्दल आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणारे साधक (१९.२.२०२२)

९. येणार्‍या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी उपयुक्त
असे बहुमूल्य लिखाण ‘Sanatan.org’ वर उपलब्ध !

नाडीभविष्य सांगणार्‍या अनेकांनी, तसेच द्रष्ट्या साधू-संतांनी ‘हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार आहे’, असे सांगितले आहे. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार समाजातील सर्वांनाच या आपत्काळाची झळ बसणार आहे. आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणेही जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी सर्वच स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे लेख सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. वाचक पुढे दिलेल्या लिंकवर हे लेख वाचू शकतात. https://www.sanatan.org/mr/natural-disasters-and-survival-guide

‘ॲप’ डाऊनलोड करण्यासाठी लिंक – https://www.sanatan.org/survival-guide-app

 

१०. ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१० अ. Sanatan.org निर्मित Android आणि iOS app ला मिळालेले अभिप्राय

१ अ. सर्व्हायव्हल गाईड ॲप (Survival Guide app)

श्री. दीपक गर्ग : ‘ही अत्यंत चांगली माहिती आहे. ही माहिती संक्षिप्त रूपात ‘व्हॉट्स ॲप’वरही लहान लहान लेखांद्वारे ‘शेअर’ करण्यासाठी पुष्कळ चांगले ‘ॲप्लीकेशन’ बनवणार्‍यांना धन्यवाद !’

१ आ. श्राद्धविधी ॲप (Shraddha Rituals App)

१ आ १. गणेश इस्टेट्स : ‘हिंदु धर्माला बळकटी द्यायची असेल, तर प्रत्येक हिंदूकडे हे ‘ॲप’ असणे आवश्यक आहे.’

१ आ २. प्रणिता प्रसाद : ‘हे ‘ॲप’ पुष्कळ छान आहे. श्राद्धविधी करण्यामागचे शास्त्र ‘सर्वांना समजेल’, अशा सोप्या भाषेत मांडले आहे.’

१ आ ३. दीप्ती सी. : ‘या कोरोना महामारीच्या काळात ‘श्राद्ध कसे करावे ?’ याविषयी शास्त्रोक्त माहिती मिळाली’, त्याबद्दल मनःपूर्वक आभार ! पितृदोषाची लक्षणे, कारणे आणि त्यांवरील उपायांची माहितीसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. या माहितीतून समाजात श्राद्धाविषयी जो अपप्रचार होत आहे, त्यावरही वैज्ञानिक भाषेत उत्तर मिळाले. हे अत्यंत महत्त्वपूर्ण ‘ॲप’ आहे. सर्व लोकांनी हे ‘डाऊनलोड’ करून यामध्ये सांगितलेल्या कृती केल्या, तर त्यांनाही नक्कीच लाभ होईल.’

१ इ. सनातन चैतन्यवाणी ॲप

१ इ १. चंदना गांधी : ‘या ॲप’वरील नामजप ऐकल्यानंतर मला पुष्कळ शांत वाटते. नामजप ऐकतांना तर मला चांगले वाटतेच; पण नामजप ऐकून झाल्यानंतरही माझे मन शांत रहाते.’

१ इ २. श्री. मनोहर गजरे : ‘हे ॲप पुष्कळच उपयुक्त आहे. यातील स्तोत्रे आणि नामजप यांचे उच्चार स्पष्ट आहेत. स्तोत्र ऐकल्यावर माझे मन पुष्कळ शांत होते. रात्री झोपण्यापूर्वी नामजप ऐकल्यावर छान झोप लागते. तुमचे पुष्कळ आभार !’

१ ई. सनातन संस्था ॲप

१ ई १. श्री. अनंत सायन : ‘स्वतःमध्ये भक्ती वाढवण्यासाठी, तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी सनातन संस्थेचे हे ‘ॲप’ अतिशय उपयुक्त आहे.’

१ ई २. श्री. गुरु चकर : ‘सनातन संस्थेचे हे ‘ॲप’ अत्यंत चांगले आहे. जे यामध्ये सांगितलेला विषय वाचून कृतीत आणतील, त्यांची निश्चितच आध्यात्मिक उन्नती होईल.’

 

११. संकेतस्थळावर आलेले अभिप्राय

११ अ. इंग्रजी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/en)

११ अ १. प्रिया प्रसाद : ‘सर्व भारतियांना अभिमान वाटेल’, असे तुमचे हे संकेतस्थळ आहे. तुम्ही देत असलेल्या माहितीमुळे गाढ निद्रेत असलेले लोक जागे होतील.’

११ अ २. धनंजय चव्हाण : ‘सनातन संस्था देत असलेल्या आध्यात्मिक ज्ञानामुळे माझे जीवन पूर्णतः पालटले आहे. पुष्कळ आभार !’

 

११ आ. मराठी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/mr)

११ आ १. मृदुला दामले : ‘या संकेतस्थळावर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. कुठलाही विधी करतांना ‘तो करण्यामागील नक्की कारण काय ?’, हे ठाऊक असणे फार आवश्यक आहे. आज याविषयी फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद !’

११ आ २. प्रदीप नारायण सावंत

‘सनातनची ‘घरोघरी लागवड मोहीम’ हा लेख वाचून दिलेला अभिप्राय : ‘नमस्कार, ‘मातीविरहित लागवड कशी करावी ? आगाशीवर लागवड कशी करावी ? खत कसे वापरावे ?’, याविषयी तुम्ही या लेखात पुष्कळ चांगल्या प्रकारे सांगितले आहे. कृतज्ञता ! मला झाडांची लागवड करणे आणि त्यांची देखभाल करणे पुष्कळ आवडते. आता मी औषधी वनस्पती गोळा करण्यास आरंभ केला आहे.’

११ इ. हिंदी भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/hindi)

११ इ १. श्री. दिलीप कुमार सिंह

‘नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा !’, हा लेख वाचून दिलेला अभिप्राय – ‘आपण खोबरेल तेल आणि गूळ यांविषयी जी माहिती सांगितली आहे, ती आम्हाला पुष्कळच आवडली. भविष्यात लोकांनी ते आपल्या आचरणात आणले पाहिजे. असे केल्यामुळे शरीर स्वस्थ, सुंदर आणि निरोगी रहाते. त्यामुळे मी सुचवू इच्छितो की, सर्व लोकांनी या लेखामध्ये सांगितल्यानुसार आचरण करावे. धन्यवाद !’

११ इ २. अरुणा परमार : ‘मी आपले आभार मानते. ताई, मला हे लेख पुष्कळच आवडले आहेत. ते वाचून मला फारच चांगली अनुभूती येत आहे.’

११ इ ३. राम

‘आपत्काळात जिवाच्या रक्षणासाठी आवश्यक पूर्वसिद्धता : भाग १’ हा लेख वाचून दिलेला अभिप्राय – ‘या लेखात अत्यंत सुंदर आणि दूरदृष्टीने परिपूर्ण अशा योजना दिल्या आहेत. तुमचे कार्य अतिशय सुंदर आणि उपयोगी आहे. पुष्कळ धन्यवाद आणि आभार !’

११ इ ४. स्मिता वैद्य

‘श्रीक्षेत्र राक्षसभुवनचे आदि दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !’, हा लेख वाचून दिलेला अभिप्राय – ‘हा अतिशय सुंदर आणि ज्ञानवर्धक लेख आहे. ‘राक्षसभुवन’सारख्या प्राचीन संस्थानांविषयी जाणणे’, ही आजची आवश्यकता आहे.’

११ इ ५. वैभव धर

‘आदरणीय सनातन संस्था अधिकारीगण, नमस्कार !
समस्त हिंदु धर्मातील मंगलमय पर्व आणि उत्सव यांनिमित्तच्या चलत्चित्रांमध्ये आपण सविस्तर शास्त्रोक्त विधी, मंगल पर्वामागील शास्त्र, उत्सवाचा पौराणिक आणि तात्कालिक इतिहास अन् इतर महत्त्वपूर्ण उपयोगी सूत्रे सांगितली आहेत. या कार्यक्रमातून केवळ उत्सवाचा संपूर्ण बोध होतो, असे नव्ह; तर सम्यक् शास्त्रातील प्रसंग आणि पुराणातील कथा अन् स्थानिक लोकांची जीवनपद्धत अन् रिती यांचेही ज्ञान मिळते. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्या विषयासंबंधी आमच्या मनातील शंकांचे निरसनसुद्धा आपण अत्यंत सोप्या भाषेत करत आहात. अशा प्रकारे ‘हिंदूंमध्ये धर्मजागृती आणि सम्यक् शास्त्राधाराचा बोध करणे’ अत्यंत स्तुत्य अन् कौतुकास्पद आहे. आपल्या कार्यक्रमांतून मला नेहमी लाभच होत आहे. पुन्हा एकदा आभार !’

११ ई. कन्नड भाषेतील संकेतस्थळ (Sanatan.org/kannada)

११ ई १. तारा के : ‘कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठीचा तुम्ही जो नामजप दिला आहे, तो जवळजवळ सर्वांनाच लाभदायक ठरला आहे.’

११ ई २. जी.एस्. सोमशेखर : ‘यातील लेखांमुळे मला ज्ञान आणि भक्ती यांविषयी अधिक माहिती मिळाली. माझ्यात साधनेसाठी आवश्यक असणारी जाणीव निर्माण झाली’, याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

११ ई ३. प्रकाश अ. : ‘परधर्मियांच्या आमिषाला बळी पडून हिंदू धर्मांतर करतात’, हे खेदजनक आहे. परिवर्तनाच्या या काळात सनातन हिंदु धर्म जतन आणि विकसित करण्याचे तुमचे कार्य अत्यंत स्वागतार्ह आहे. तुम्ही सनातन हिंदु धर्माविषयी दिलेली माहिती कौतुकास्पद आहे.’

११ ई ४. शिवनगौडर एच्. पाटील : ‘सनातन संस्था सनातन धर्माविषयीचे आचरण समजावून सांगण्याचे मोठे कार्य करत आहे. धन्यवाद !’

११ ई ५. वंदना पुजारी : ‘पुष्कळ उपयुक्त माहिती आहे. प्रत्येकाने हा विषय समजून घेऊन दैनंदिन जीवनात कृतीत आणायला हवा, जेणेकरून त्यांना मनःशांती मिळेल.’

 

Leave a Comment