सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य पडताळणी !

ज्येष्ठ नागरिकांच्या त्वचेच्या रोगांची पडताळणी करतांना त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे

कोल्हापूर – सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली. त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी येथील ६० ज्येष्ठ नागरिकांच्या त्वचेच्या रोगांची पडताळणी करून त्यांना सल्ला आणि औषधे दिली. या उपक्रमात सनातन संस्थेच्या सौ. अनिता करमळकर, श्रीमती अर्चना करी, श्री. सिद्धेश बराले सहभागी झाले हाेते. या वेळी करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

Leave a Comment