महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

देहली – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने कॅनॉट प्लेस येथील प्राचीन शिव मंदिरामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.

 

अभिप्राय

श्री. रघु चावला – सनातन संस्था पुष्कळ चांगले कार्य करत आहे. हे आम्ही स्वतः करू शकत नाही; पण आपण अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करत आहात.

क्षणचित्र – साधक अध्यात्माविषयी सांगत असलेली माहिती ऐकून प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या एक शिक्षिका अतिशय प्रभावित झाल्या.

Leave a Comment