बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !

अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्‍या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.