नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

श्री. अतुल आर्वेन्ला

 

प्रतिष्ठितांकडून मिळालेला प्रतिसाद

१. ‘धर्माभिमान्यांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी सांगितल्यानंतर त्यांतील एका व्यक्तीने पूर्ण विषय समजून घेतल्यानंतर लगेच १०९ ग्रंथांची मागणी दिली.

२. उद्योजक श्री. मनोज टावरी आणि श्री. श्याम सुंदर सोनी यांनी सनातन संस्थेच्या हिंदी भाषिक ग्रंथांच्या पूर्ण संचाची मागणी दिली.

३. आधुनिक वैद्य राजेश सिंगारे यांना भेटून विषय सांगितल्यानंतर त्यांनी आगाऊ रक्कम दिली. ते म्हणाले, ‘‘माझा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर विश्वास आहे. तुम्हाला जिथे योग्य वाटेल, त्या ठिकाणी तुम्ही हे ग्रंथ वितरित करा.’’ त्यांनी काही ग्रंथ त्यांच्या रुग्णालयात ठेवण्याचीही अनुमती दिली.

 

सौ. नमिता दुखंडे, (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) परळ, मुंबई.

सौ. नमिता दुखंडे

एका व्यक्तीने स्वतःहून सनातनच्या ग्रंथांविषयी
विचारून ग्रंथ घेणे आणि त्या वेळी ‘गुरुदेवच आपल्याला योग्य त्या
व्यक्तीकडे घेऊन जात आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

मला तातडीच्या बैठकीसाठी कार्यालयात जावे लागले. बैठक संपल्यावर कार्यालयातील एक व्यक्ती अकस्मात् माझ्यासमोर आली आणि मला म्हणाली, ‘‘मला सनातनचे ग्रंथ हवे आहेत. ते तुम्ही उद्या घेऊन या.’’ मी समवेत नेलेले ग्रंथ त्यांना दाखवले. त्यांनी काही ग्रंथ विकत घेतले आणि आणखी काही ग्रंथांची मागणी दिली. त्या वेळी ‘गुरुदेवच मला योग्य त्या व्यक्तीकडे घेऊन जात आहेत’, याची मला जाणीव झाली आणि माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

Leave a Comment