गोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता

मडगाव – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील श्री समर्थ गड मंदिर येथे ‘साधना’ या विषयावर सनातनच्या साधिका सौ. सारिका कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या शिरोडकर यांनी केले. बेतुल येथेही श्रीराम मंदिरात प्रवचन घेण्यात आले. तसेच किटल, फार्तपा येथे श्री शांतादुर्गा मंदिरात सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

 

मंदिरांची स्वच्छता

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

Leave a Comment