मथुरा (उत्तरप्रदेश) येथे श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता !

मथुरा (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून मथुरेतील श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली. ७ मे २०२२ या दिवशी झालेल्या या पवित्र कार्यात भक्तांनी उत्स्फूर्तपणे साहाय्य केले.

 

मंदिर स्वच्छ केल्याने त्याच्या चैतन्याचा
लाभ समाजाला होतो ! – अरविंद गुप्ता, सनातन संस्था

मंदिर स्वच्छता अभियानाविषयी उपस्थित जिज्ञासूंना माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अरविंद गुप्ता म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे दिव्याच्या काचेवर आलेली काजळी स्वच्छ करावी लागते. तेव्हाच दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो. मंदिर चैतन्याचे स्रोत असल्याने त्यांची स्वच्छता केल्याने स्वतःसह समाजालाही चैतन्याचा लाभ होतो. एक दिवस मंदिराची स्वच्छता करून न थांबता आपण त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला हवेत, तसेच मंदिराच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमीच जागरूक रहायला हवे. मंदिरांच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी हिंदूंनी सदैव कृतीशील रहाणे, हीच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त खरी कृतज्ञता ठरेल.’’

क्षणचित्रे

१. या उपक्रमासाठी स्थानिक धर्मप्रेमी आशा सोलंकी आणि मंदिराचे पुरोहित यांनी विशेष साहाय्य केले.

२. तीव्र ऊन असतांनाही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्याचे अनेकांनी कौतुक केले.

Leave a Comment