साधकांवर प्रेमाची पखरण करणार्या सौ. अश्विनी पवार ६९ व्या संतपदी विराजमान !
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सौ. अश्विनी पवार हिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
