नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि शौर्य जागरण प्रात्यक्षिके सादर

हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्‍याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.

सनातनचा आश्रम दैवी शक्तीचा स्रोत आहे ! – श्री. पी. पद्मनाभ भट, इंदूर, तेलंगण

आश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर २०१७ नंतर या आश्रमाला अधिक गती प्राप्त होईल. आश्रमाचे कार्य झपाट्याने वाढेल आणि त्याची ख्याती दूरवर पसरेल.

महाराष्ट्र : सनातन संस्थेद्वारे राबवण्यात आलेल्या आदर्श नवरात्रोत्सव मोहिमेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भांडुप येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संजय गोठिवडेकर यांच्या घरी डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रवचन घेतले. प्रवचनाला श्री. गोठिवडेकरांचे १२ नातेवाईक उपस्थित होते. प्रवचनानंतर सर्वांनी नवरात्रीचे अध्यात्म शास्त्रीयज्ञान मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कुंकूमार्चन आणि प्रवचन

येथील छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळ, नवजवान मित्र मंडळ आणि श्री महाकाली मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त कुंकूमार्चन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांना जिज्ञासू महिला आणि तरुण यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.

सतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ !

‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.

गोंडा, उत्तरप्रदेश येथील श्री वाराहीदेवी !

गोंडा, उत्तरप्रदेश येथील मुकुंदनगर गावात श्री वाराहीदेवीचे मंदिर आहे. मंदिरात अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याच्या फांद्या मंदिर परिसरात विस्तारलेल्या आहेत. श्री वाराहीदेवी उत्तरी भवानीदेवी या नावानेही ओळखली जाते.

अखंड ज्योतीस्वरूपात असलेली कांगडा, हिमाचल प्रदेश येथील श्री ज्वालादेवी !

या ठिकाणी नैसर्गिकरित्या ९ ज्वाळा तेवत असतात. ९ ज्वाळांमधील प्रमुख ज्वाळा महाकाली देवीची आहे. अन्य ८ ज्वाळा अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजना या देवींच्या आहेत.

हिंदूंचा पराक्रमी राजा विक्रमादित्य यांची कुलदेवी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री हरसिद्धीदेवी !

उज्जैन, मध्यप्रदेश येथील प्रमुख मंदिरांमध्ये श्री हरसिद्धीदेवी मंदिराची गणना होते. ही देवी राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती. प्राचीन काळी देवी ‘मांगलचाण्डिकी’ या नावाने ओळखली जात असे.

नवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके !

हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे, त्या अनुषंगाने अन् पौरोहित्य करतांना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो.