गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘विजयवाडा बूक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन

गुंटूर – शहरात प्रथमच विजयवाडा बूक फेअरमध्ये विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.येथे सनातनचे तेलुगु भाषेतील ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची भेट देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात योगदान देणारे व्यावसायिक !

भारतभरातील काही हितचिंतक विविध सणांच्या निमित्ताने नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी यांना ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट स्वरूपात देऊन हे अमूल्य ग्रंथभांडार सर्वदूर पोहोचवत आहेत.

पुणे येथे सनातनचा अध्यात्मप्रसार

पुणे – सिंहगड रस्ता येथील माणिकबाग परिसरातील सनातन प्रभातच्या हिंदी पाक्षिकाचे वाचक श्री. जेठाराम चौधरी यांनी त्यांच्या ग्रीन मार्ट या दुकानात सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवून धर्मप्रसाराच्या कार्यात सहभाग नोंदवला आहे.

लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन !

लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी घाला ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदनाद्वारे मागणी

देवतांची चित्रे असलेल्या, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री सरकारने थांबवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती.

विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणती नकारात्मक, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणती सकारात्मक असल्याचे सिद्ध !

विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी अशी चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला.

दिवाळी : शंकानिरसन

दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा.

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले.

सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

श्री. शामराव पवार आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात.