संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज

Article also available in :

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यासारख्या अवतारांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. अशा जिवांची जन्मतःच विश्‍वबुद्धी आणि विश्‍वमन यांकडे झेप असते

असे जीव जन्मतःच पारदर्शक असल्याने यांची बुद्धीची क्षमता विश्‍वबुद्धीकडे झेप घेणारी, तर मनाची क्षमता लहान होण्याकडे, म्हणजेच विश्‍वमनाकडे धावणारी असते.

२. वैयक्तिक प्रारब्धभोग नसल्याने जन्मतःच समष्टी भोग भोगणे

अवतारत्व जन्मापासूनच धारण करणार्‍या जिवांना वैयक्तिक प्रारब्धभोग नसल्याने ते जन्मतःच समष्टी भोग भोगतात.

३. सांगितलेले सिद्धांत ब्रह्मवाक्याप्रमाणे असणे

यांचे जीवन अद्वैतरूपी धर्मसिद्धांत मांडणारेच असल्याने यांच्या जीवनाला आणि मार्गदर्शनात्मक शैलीला ब्रह्मरूपी कर्मसिद्धांताची झालर प्राप्त झाल्याने हे सिद्धांत ब्रह्मवाक्याप्रमाणे अनुकरणीय झाले आहेत.

– एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’ या नावाने प्रसिद्ध आहे.)

 

संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्याकरवी वदविलेल्या वेदांचा प्रसंग

श्रीक्षेत्र आळंदीच्या धर्म मार्तंडांनी श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र मागितले. त्यामुळे ही भावंडे पैठण येथे गेली. पैठण येथील धर्मसभेमध्ये त्यांना अनेक सत्त्व परिक्षांना सामोरे जावे लागले. त्यावेळी समोरून ‘वाकोबा’ नावाचा कोळी आपल्या ‘गेनोबा’ नावाच्या रेड्यास घेऊन जात असतांना धर्मसभेतील एका धर्म पंडिताने ज्ञानदेवांना विचारले की, ‘त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का ?’ तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, ‘तोची माझा आत्मा ॥’ ‘हेे सिद्ध करुन दाखव’, असे संगितल्यावरून श्री ज्ञानदेवांनी सदर रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्यावेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’ (ही ऋग्वेदाची पहिली ओळ आहे.)

तेव्हापासून सदर रेडा हा संत ज्ञानेश्‍वरांचा पहिला शिष्य झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने ज्ञानदेवांना शुद्धीपत्र बहाल केले.

जगदोद्धाराची शिकवण देणार्‍या ज्ञानेश्‍वरीचे रचियते संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची श्रीक्षेत्र आळंदी येथील समाधी ! हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर होण्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधी मंदिराचा कळस. त्यातील अधिकाधिक चैतन्य ग्रहण होण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करूया.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या मातोश्रींनी ज्या वृक्षाला सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या, तोच हा समाधी मंदिरातील प्राचीन ‘सुवर्ण पिंपळ’ वृक्ष !

हिंदु धर्माची पताका सर्वदूर पोहोचवण्याची शिकवण देणार्‍या संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे श्रीक्षेत्र आळंदी येथील समाधी मंदिर

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला होता, त्या रेड्याचे समाधी मंदिर ! (वर्तुळात रेड्याची मूर्ती दिसत आहे.)

(स्थळ : श्रीक्षेत्र आळे, ता. जुन्नर, जि. पुणे)

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला संतांच्या मंदिरांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.

4 thoughts on “संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज”

  1. तुमच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे इतकी सुंदर माहिती, छायाचित्र आणि घरबसल्या माऊलींचे दर्शन आम्हाला घडतय. धन्यवाद अंजली ताई .

    Reply
  2. अतिशय सुंदर लेख खुप छान
    खुप खुप धन्यवाद

    Reply

Leave a Comment