श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्‍या गोपी !

श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण केली आहे. तो प्रत्येकाला त्याचा एकेक गुण देतो; कारण एकच गुण कितीतरी जणांना शिकवू शकतो.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग २) !

सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प.पू. भक्तराज महाराज हे गुरु होत. त्यांच्याच कृपाशीर्वादाने सनातनची स्थापना झाली. सनातनला प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचेही कृपाछत्र लाभले. त्यांच्या आशीर्वादाने वर्ष १९९१ मध्ये स्थापन झालेल्या सनातनच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सनातन परिवार प.पू. बाबांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !

गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी ! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले.

गुरुपौर्णिमा निमित्त भगवंत आणि गुरु यांच्याप्रती भाव वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे ?

‘आपत्काळ जसा जवळ येऊ लागला आहे, तशी सर्व साधकांची भावजागृती होऊन त्यांना अधिक काळ भावावस्थेत रहाता यावे आणि साधकांची शीघ्रातीशीघ्र आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी दयाळू, कनवाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रती आठवड्याला २ घंटे भावसत्संग चालू करण्यास सांगितले.

पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह पाक्षिक सांस्कृतिक वार्ताच्या व्यवस्थापिका सौ. सुनिता पेंढारकर आणि कर्मचारी होते.

मंगळुरू येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठल्याविषयी त्यांचा सनातनकडून सन्मान

येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला घोषित केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पू. उदयकुमार यांचा श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला.

डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !

आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या पंरपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; पंरतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्टवा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.

पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा !

प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंदयात्रेत सहभागी होऊन विठुरायला भेटूया. वारीसमवेत प्रत्येक जिवाच्या आयुष्याची वारीही भक्तीमय होऊ दे, ही प्रार्थना !

स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ?

परात्पर गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही त्यांंच्यावर अपार श्रद्धा ठेवून ६८ वे संतपद गाठणार्‍या जळगाव येथील सौ. केवळबाई पाटीलआजी !

त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले.