सोलापूर – येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. घाटगे यांनी मकरसंक्रांतीचे धर्मशास्त्र, वाण देण्याचे महत्त्व सांगितले, तसेच हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रणही दिले. या वेळी ११५ महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सौ. उपाध्ये यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सौ. सुधा घाटगे यांचा सत्कार केला.
सोलापूर येथे संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ध्वजारोहण
सोलापूर येथील संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने येथे २६ जानेवारीनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आणि सौ. राजश्री देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. विक्रम घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देऊन सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी सहकुटुंब सभेला उपस्थित राहू, असे सांगितले. या वेळी त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. दुर्गदास कुरापाटी यांनी विशेष प्रयत्न केले. या वेळी अष्टविनायक तरुण मंडळ, संयुक्त मित्र मंडळ यांचे ६५ कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !