सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.

साधनेत प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन हाच एकमेव पर्याय ! – श्री. संदीप शिंदे, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधना करणे आवश्यक असून आपण कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया आवश्यक आहे. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती हे साधनेचे ध्येय आहे.

मूर्तीदान घेणार्‍या संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विसर्जन घाटांवर फिरकले नाहीत !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रबोधन आणि भाविकांच्या जागरूकतेचा परिणाम म्हणून यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी भाविकांचा धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याकडे कल पहायला मिळाला.

सनातनची भूमिका लवकरच प्रसारमाध्यमांसमोर मांडू ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची अन्वेषणाची दिशा जाणीवपूर्वक भरकटवण्याचा प्रकार काही सनातन विरोधक आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून केला जात आहे.

डॉ. भारत पाटणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! – एक पत्रकार

वार्ताहराला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या प्रकरणी डॉ. पाटणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातला आहे.

वडोद (जिल्हा संभाजीनगर) येथील मंदिरात कठोर साधना केलेले नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पू. महाराजांना सनातनचे पंचांग भेट दिले आणि सनातनच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

फोंडा येथील न्यायालयात सनातन संस्थेने दाखल केलेल्या दाव्याच्या वेळी राजन नारायण यांची मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट्यासह उपस्थिती !

वर्ष २००८ मध्ये संस्थेने दावा प्रविष्ट केला असून त्यानंतरच्या ९ वर्षांत राजन नारायण यांना आताच असे न्यायालयात येतांना संरक्षण घ्यावेसे का वाटले ? सनातन संस्थेची जमेल तेवढी अपकीर्ती करण्यासाठीच हे असे नाटक करण्यात आले.

डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी ! – राहुल कोल्हापुरे, सनातन प्रभात

निमंत्रण देऊनही प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत डॉ. भारत पाटणकर यांनी ‘आम्ही सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला बोलावले नाही,’ असे धादांत खोटे बोलून सनातन प्रभातच्या पत्रकाराला तेथून बाहेर जाण्यास सांगितले.

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नव्हे, तर मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होते ! – वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे

मूर्तींवरील रासायनिक रंग पर्यावरणासाठी अधिक घातक आहेत. याउलट प्लास्टर ऑफ परिस (पीओपी) हे अल्प घातक आहे, असा दावा जलप्रदूषणासंबंधी संशोधन करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

(म्हणे) ‘अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पतसंस्थेत घोटाळा नाही !’

श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेशी कॉ. गोविंद पानसरे यांचा काहीही संबंध नसून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.