चतु:श्रृंगी मंदिर (पुणे) येथे सनातनचे भव्य प्रदर्शन !

या प्रदर्शनामध्ये धर्म-अध्यात्म, आचारधर्म, बालसंस्कार आदी धर्मशिक्षणविषयक ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच उदबत्ती, कापूर, अत्तर, उटणे, जपमाळ आदी पूजोपयोगी आणि नित्योपयोगी वस्तूही उपलब्ध आहेत.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात धर्मप्रेमींकडून दान केलेल्या गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

तालुक्यातील मुगळी गावात महाविद्यालयीन तरुणांनी गणेशभक्तांना फसवून दान म्हणून घेतलेल्या ६५ ते ७० गणेशमूर्ती आणि १ ट्रॉली निर्माल्य ३ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता नदीत विसर्जन केले.

कॉ. पानसरे यांच्या विविध अधिकोषांतील आर्थिक उलाढालीच्या आवेदनावर २५ ऑक्टोबरला सुनावणी होणार

कॉ. गोविंद पानसरे यांच्या विविध अधिकोषांतील (बँकांतील) आर्थिक उलाढालीच्या आवेदनावर, तसेच खटल्यातील संशयित आरोपी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे २५ ऑक्टोबरला सुनावणी होईल, असे अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग २) एल्.डी. बिले यांनी २१ सप्टेंबरला सांगितले.

सनातन संस्थेचे ग्रंथ समाजाला दिशादर्शक ! – मयुर घोडके, शिवसेना

समाजाला आज अध्यात्म, धर्म यांची अत्यंत आवश्यकता असून सनातन संस्थेचे ग्रंथ समाजाला दिशादर्शक आहेत, असे मत शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके यांनी व्यक्त केले.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेली श्रीक्षेत्र काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री बंदीदेवी

श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्‍वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे.

देवीची मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

मूर्ती पडून भग्न झाल्यास तो अपशकून समजण्यात येतो. देवतेचा मुकुट पडणे, हाही एक अपशकून असतो. आगामी संकटाची ती पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. पांडे महाराज यांच्या शुभहस्ते दैनिक सनातन प्रभातच्या नूतन ‘अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप’चे उद्घाटन !

सनातनच्या वतीने काढण्यात येणार्‍या दैनिक सनातन प्रभातच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’चे उद्घाटन २१ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात प.पू. पांडे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेषण करणारे पोलीस बिर्याणी झोडण्यात आणि प्रसारमाध्यमांना अन्वेषणाविषयी खोट्या बातम्या देण्यात मग्न !

मैत्रीपूर्ण संबंध असणार्‍या पत्रकारांना हाताशी धरून ‘स्वतः खूप मोठा तपास करत आहोत’, अशा फुशारक्या मारणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करून घेणे आणि मटण बिर्याणी झोडणे एवढाच उद्योग ते करत आहेत,

झारखंड राज्यातील जगप्रसिद्ध श्री छिन्नमस्तिका देवीचे अतिप्राचीन मंदिर !

झारखंडची राजधानी रांची येथून ८० किलोमीटर अंतरावर रामगढ जिल्ह्यात असलेल्या रजरप्पा गावामध्ये श्री छिन्नमस्तिका देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील प्राचिन मंदिरांपैकी हे एक असून भैरवी आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे.

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी उठवावी,