
जयपूर (राजस्थान) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली. या वेळी त्यांच्यासमवेत जयपूर येथील साधक श्री. ऋषि राठी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच श्रीमती अर्चना खेमका या साधिका उपस्थित होत्या.
खोले हनुमान मंदिराचा इतिहास
खोले हनुमान मंदिर हे जयपूर जिल्हा मुख्यालयापासून ९ कि.मी. अंतरावर एका टेकडीवर आहे. वर्ष १९६० च्या दशकात पंडित राधेलाल चौबे यांना दृष्टांत झाला. त्यांना एका निर्मनुष्य अशा टेकडीवर भगवान हनुमानाची एक मोठी शयनमुद्रा असलेली शिळा आढळली. देवतेचे दर्शन झाल्यावर त्यांनी तिथे पूजा करणे चालू केले आणि पुढे पूर्ण आयुष्य त्या हनुमंताची सेवा करत राहिले. त्यांच्या अथक सेवेमुळे हा ओसाड प्रदेश एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले. वर्ष १९६१ मध्ये पंडित चौबे यांनी मंदिराचा विकास करण्यासाठी ‘नरवर आश्रम सेवा समिती’ची स्थापना केली. पावसाळ्यात डोंगरांमधून पाणी वहात असल्याने मंदिराचे नाव ‘खोले के हनुमानजी’ असे पडले.

हनुमंताचे दर्शन घेतल्यावर तेथील पुजार्याने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा हार घालून सन्मान केला. हनुमंताचा शेंदूर आणि त्याला नेसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून दिले. त्या ठिकाणी असणार्या श्रीराममंदिरातही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि साधक यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. त्या मंदिरात रामपंचायतन मूर्ती आहेत. या मंदिरातील मुख्य पुजारी श्री. पवन कुमार यांची भेट झाली. त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना मंदिराचा इतिहास सांगून स्थानमाहात्म्य सांगितले. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्यांना रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले.
खोले हनुमान हा नवसाला पावणारा देव आहे. भक्त या ठिकाणी देवाला स्वतःच्या मनातील इच्छा सांगतात आणि देव ते पूर्ण करतो. त्यामुळे या ठिकाणी वर्षभर नियमित संध्याकाळी ‘सव्वमन’, म्हणजे दाल-बाटीचा प्रसाद वाटप केला जातो. या ठिकाणी नियमित सहस्रो भक्त हनुमानाचे दर्शन आणि प्रसाद घेण्यासाठी येत असतात.
वैशिष्ट्यपूर्ण
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या खोले हनुमान मंदिरात हनुमंताचे दर्शन इतर भाविक दर्शन घेतात, त्या ठिकाणावरून घेत होत्या, तेव्हा मंदिरातील पुजार्यांना ‘या कुणीतरी मोठ्या आध्यात्मिक अधिकारी आहेत’, असे जाणवले आणि त्या पुजार्यांनी त्यांना गर्भगृहाजवळ हनुमंताच्या दर्शनासाठी नेले.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...