‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

सनातन संस्थेचा द्वेष करण्यापेक्षा तिचे कार्य पहा ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना याविषयी भाष्य केल्यानंतर जवाहर बर्वे यांच्या सनातन संस्थेवरील अज्ञानमूलक टिकेचे केले खंडन !

रामनवमीच्या निमित्त पुणे येथे प्रवचन, ग्रंथप्रदर्शन कक्ष आदी उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीरामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

यज्ञदत्तात्रेय क्षेत्र जुज्जूरु (आंध्रप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ‘ज्योतिष्ठोम अग्निष्टोम यागा’ला वंदनीय उपस्थिती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची यागाला वंदनीय उपस्थिती !

पुणे येथे ‘राधा-राणी पाणपोई’चे सद्गुरु आणि संत यांच्या शुभहस्ते उद्घाटन !

काळेपडळ येथील श्री राधाकृष्ण मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० मार्च या दिवशी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘पुणे सार्वजनिक सभा’ यांच्याकडून ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणार्‍या कै. ग.वा. जोशी यांनी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रसाराला आरंभ !

आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आलेल्या महोत्सवाच्या फलकाचे उद्घाटन ३० मार्च या दिवशी करण्यात आले. बांदिवडे गावाचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांनी श्रीफळ वाढवून या फलकाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी फलकाचे पूजन करण्यात आले.

सातारा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित बलीदान मास समारोप कार्यक्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे व्याख्यान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाची सांगता होणार आहे. यानिमित्त २९ मार्च या दिवशी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.