(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्या सनातनच्या साधकांनी डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने योजनाबद्धरित्या केल्या !’ – अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

डॉ. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्या सनातनच्या साधकांनी डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने योजनाबद्धरित्या केलेल्या हत्या आहेत, अशा प्रकारे धादांत खोटे वक्तव्य करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अन्वेषण पूर्ण होण्याआधीच पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि साधक यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. 

मंगळूरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवावर जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.चा आक्षेप !

कार्यक्रमाचे आयोजन करणा-यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, असे हिरवे फुत्कार एस्.डी.पी.आय.च्या (सोशल डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या) दक्षिण कन्नड जिल्हा समितीने सोडले

(म्हणे) ‘सनातन संस्थेच्या सूत्रधारांना पकडा !’ – श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

‘काडीचीही पात्रता नसतांना अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्षपद उबवून वर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काहीही न करणारे सबनीस हेच मराठी माणसाला कलंक आहेत’, असेच मराठी लोकांना वाटते ? – संपादक

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात धर्मांधाकडून मोठ्या प्रमाणात जिहाद करण्याच्या धमकीचे पत्र

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात २४ एप्रिल या दिवशी धर्मांधाकडून ऊर्दूमिश्रित हिंदी भाषेतील धमकीचे निनावी पत्र टपालाने आले आहे. या पत्रामध्ये धर्मांध मोठ्या प्रमाणावर जिहाद करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसकडून सनातनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘हे आरोपी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांचे सदस्य आहेत. त्यांना तथाकथित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करायचे आहे. याचा उल्लेख मराठी पुस्तक ‘क्षात्रधर्म साधना’मध्ये असून ते सनातन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.

(म्हणे) ‘सनातन आणि काश्मीरमधील आतंकवादी हे दोन्ही आतंकवादीच !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रातील सनातन संस्था असो किंवा काश्मीरमधील आतंकवादी असो, आमच्या दृष्टीने सर्व आतंकवादीच आहेत.

‘दाभोलकर आणि पानसरे यांना असुर समजून ठार करण्यात आले !’ – माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचा मनमानी आरोप

शास्त्रानुसार आचरण करत नाहीत ते असुर असून ते भगवंताचा द्वेष करतात. अंधश्रद्धेविरोधी झगडणारे डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना असुर समजून ठार करण्यात आले, असा आरोप माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.

(म्हणे) ‘पनवेल येथील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली !’ – प्रकाश आंबेडकर

पनवेलमधील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली, असा धादांत खोटा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी खांदा कॉलनी येथे ‘बहुजन वंचित आघाडी’च्या सभेत ७ मार्च या दिवशी केला.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर सरकार बंदी घालत नाही !’ – राधाकृष्ण विखे-पाटील

 अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणातून काहीच निष्पन्न झालेले नाही. पोलिसांना ठिकठिकाणी शस्त्रे आणि बॉम्ब यांचे साठे सापडत आहेत. त्याविषयी सरकार कोणतीही कारवाई करत नाही.

सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी अपप्रचार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘सनातनी विखार’ आणि ‘सनातनची सभा वादात अडकण्याची शक्यता’ असे मथळे देऊन पूर्वग्रहदूषित वृत्त प्रसारित केले.