हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ संबोधले !

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा सनातनद्वेषाचा कंड !

सौजन्य : abp माझा

मुंबई – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेचा पुन्हा एकदा ‘आतंकवादी’ असा उल्लेख केला. ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना ते म्हणाले, ‘‘मी धर्माचा अभ्यासक नाही. मी मुख्यमंत्री म्हणून एका ‘दहशतवादी’ संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या संघटनेचे नाव सनातन संस्था आहे. ती कदाचित् ‘रजिस्टर एन्.जी.ओ.’ (नोंदणीकृत अशासकीय संस्था) असू शकेल.

त्या संस्थेचे नाव त्यांनी ‘सनातन’ ठेवले आहे, यात माझा काय दोष ? मला केवळ त्या संस्थेवर बंदी घालायची आहे. धर्मावर बंदी घालण्याविषयी मी म्हटले नव्हते. माझे वक्तव्य समजले नसेल, तर माझे दुर्भाग्य आहे. मी आणखी स्पष्ट बोलायला हवे होते.’’

सौजन्य : नवराष्ट्र

३१ जुलै या दिवशी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि त्यात ७ आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘भगवा नव्हे, तर सनातनी आतंकवाद म्हणा’, अशा प्रकारचे हिंदुद्वेषी विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो’, असे अश्लाघ्य विधान केले होते.

सनातन संस्थेची माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू ! – सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

 

मुंबई – ‘काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ संबोधून तिला वारंवार लक्ष्य केले आहे. यापूर्वी मडगाव बाँबस्फोट प्रकरणात तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी सनातनला नाहक गुंतवले; नंतर मा. न्यायालयाने सनातनच्या सर्व निष्पाप साधकांना निर्दोष मुक्त करत सनातनला गोवण्यात आल्याचे निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले होते. केवळ मालेगाव प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठांनाच नव्हे, तर सनातन संस्थेलाही ‘आतंकवादी’ घोषित करून ‘हिंदु दहशतवादा’ची थियरी काँग्रेसला प्रसारित करायची होती. काँग्रेसने केलेली पापे आज समोर येतांना दिसत आहेत, अशी भूमिका सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मांडली.

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, न्यायालयाने जसे सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता केली, तद्वतच मालेगाव प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठांचीही निर्दोष मुक्तता करत काँग्रेसी हिंदुद्रोही राज्यकर्त्यांना आणि ‘हिंदु दहशतवाद’ प्रसारित करणार्‍यांना जोरदार चपराक लगावली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या हिंदुत्ववाद्यांनी केली’, असे सांगत पोलिसांना तपासाची दिशा ठरवून दिली होती. मा. न्यायालयाने या प्रकरणातही सनातन संस्था म्हणून ज्या साधकांना गोवण्यात आले होते, त्यांना निर्दोष मुक्त केले. अशी वक्तव्ये करून तोंडावर पडलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी खरंतर हिंदु समाजाची माफी मागण्याची आवश्यकता आहे, तरी ते पुन्हा पुन्हा हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागितली नाही, तर सनातन संस्था त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही श्री. राजहंस यांनी दिला.

सनातन धर्माचा अपमान करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबई – हिंदु आणि सनातन धर्म यांचा अवमान करणार्‍यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. अशा वेळी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आठवत नाही का ? ठाकरे यांचे केवळ मतांसाठी असलेले सोयीचे हिंदुत्व आहे.

ज्या वेळी भगव्यावर वार होईल, त्या वेळी त्याला उत्तर देण्याचे काम आमची शिवसेना करेल. राहुल गांधी नेहमीच सावरकर आणि हिंदुत्व यांचा अवमान करतात.

‘सनातनी आतंकतवाद’ ही भाषा म्हणजे हिंदु धर्माचा अवमान ! – नितेश राणे,  मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे

मुंबई – ‘हिंदु आतंकवाद’ किंवा ‘सनातनी आतंकवाद’ ही भाषा भारताच्या हिंदु आणि संत परंपरेला अपकीर्त करण्यासाठी केलेली व्याख्या आहे. पूर्वी सुशीलकुमार शिंदे, नंतर पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.

खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदु धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाड यांचा एकमेव कार्यक्रम असतो. आव्हाड यांची भाषा म्हणजे हिंदु धर्माचा अवमान असून आव्हाडांच्या या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहमत आहेत का ?

Leave a Comment