मी, माझे कुटुंब एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

चिपळूण येथे सनातन संस्थेच्या वतीने जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन

श्री. सुरेश शिंदे आणि मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये

चिपळूण, १५ ऑगस्ट (वार्ता.) – आज समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक समस्या दिसत आहेत. धर्मशिक्षण नसल्याने तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. भारत युवकांचा देश असूनही युवकांना योग्य दिशा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. संत ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; मात्र आजची पिढी दिशाहीन झाली आहे. या पिढीला देव-देश-धर्म यांवरील संकटाची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. काळाचा विचार करता मी, माझे कुटुंब, संसार एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. शहरातील चितळे मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. याचा ८५ जणांनी लाभ घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे उपस्थित होते.

सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की,
१. हिंदु धर्मात वृद्धाश्रम व्यवस्था नव्हती. आता पालक नकोसे झाले आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एका सर्वेक्षणात आपल्या देशामध्ये पुढील ३ वर्षे वृद्धाश्रम आरक्षित झाले आहेत, असे वृत्त आहे.

२. घर, मंदिरे, शाळा कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. पालकही लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष (मोबाईल) देतात. त्यांना वेळीच शिवराय छत्रपती शिवराय, भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांची शिकवण दिली असती; तर म्हातारपणी पालकांची दुरवस्था झाली नसती.

३. पूर्वी वयस्कर लोकांना आजार व्हायचे. आता लहान मुलांनाही मधुमेह, कर्करोग, हृदयविकाराचे झटके येत आहे. मृत्यू अगदी स्वस्त झाला आहे.

४. अनेक विवाहीत महिला, तसेच मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. ही स्थिती का निर्माण झाली ? आपल्याला अंगभर कपड्याचे महत्त्व नाही, आपण कुंकू लावत नाही, दागिने घालत नाही. धर्मशिक्षण नसल्यामुळेच ही अवस्था झालेली आहे .

५. आपल्याला धर्माचा अभिमान असायला हवा. पूर्वी घराघरांमध्ये स्तोत्र, रामरक्षा म्हटली जायची; मात्र आजकाल तो वेळ मालिका, मोबाईल बघण्यामध्ये जातो. इतर धर्मियांना ‘मदरसे, कॉन्व्हेंट स्कूल’ यामधून धर्मशिक्षण दिले जाते; मात्र आपल्या मंदिरामध्ये किंवा घरात कुठेही धर्मशिक्षणाची सोय नाही.

६. आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.

७. ही स्थिती पालटण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन संघटितपणे प्रयत्न करायला हवे.

Leave a Comment