
सांगली, ११ ऑगस्ट (वार्ता.) – येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सनातन संस्थेच्या सौ. रत्ना भंगाळे, डॉ. (सौ.) मधुरा कुलकर्णी, डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
अपंग सेवा केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी पुष्कळ साहाय्य केले. या वेळी अपंग मुलांनी उत्कृष्टपणे एक नाटिका आणि समूह नृत्यही सादर केले. या उपक्रमासाठी केंद्रातील सौ. श्रुती वेलणकर, सुश्री गीतांजली कुलकर्णी, सौ. पूजा पाटील, सौ. राधा संकपाळ, सौ. तृप्ती हेगडे यांचे सहकार्य लाभले. केंद्रातील निरंजन सूर्यवंशी, केदार पाटील, ऋजुल कामानी, योगेश लेले, कमलेश शुक्ला, नीलभा कवठेकर, स्नेहा जाधव, हर्ष गायकवाड, सूरज खंबाळकर, सौरभ हराळे या मतीमंद मुलांना राखी बांधण्यात आली. या वेळी केंद्रातील सर्वांच्या मनात परिवाराची एकीची भावना निर्माण झाली. केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी ‘सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले आहे. साधकांच्या सहवासात येथील मुले आनंदी झाली’, असा आवर्जून उल्लेख केला.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...