‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेने जुलै २०२५ पर्यंत मराठी ३४७, इंग्रजी २०१, कन्नड २०१, हिंदी १९९, गुजराती ७०, तेलुगु ५४, तमिळ ४६, बंगाली ३०, मल्ल्याळम् २५, ओडिया २२, पंजाबी १३, नेपाळी ३ अन् आसामी २, अशा १३ भाषांत १ कोटी ८४ सहस्र प्रती प्रसिद्ध केल्या आहेत. संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी प्रासंगिक, नैमित्तिक, तसेच सण अन् उत्सव यांवेळी ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात. त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेनुसार काही ग्रंथ मांडले जातात; मात्र सर्व ग्रंथ प्रदर्शनात मांडायला मर्यादा येते. त्यामुळे जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ तिथे उपलब्ध नसल्यास तो ग्रंथ किंवा त्याला पर्यायी ग्रंथ उपलब्ध करून देण्याविषयी नम्र्रतेने विचारावे. त्याचसमवेत ‘सनातनचे ग्रंथभांडार पुष्कळ मोठे आहे’, हे जिज्ञासूंना समजण्यासाठी साधकांनी त्यांना ग्रंथसूची दाखवावी. ती पाहून जिज्ञासूंना हव्या असलेल्या ग्रंथांची मागणी देता येऊ शकेल.
जिज्ञासूंनी मागणी केलेले ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी पुढील पद्धतीचा उपयोग करता येईल.

१. जिज्ञासूचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ग्रंथाची मागणी यांची नोंद करून घ्यावी. जिज्ञासूंना तो ग्रंथ त्यांचे घर किंवा कार्यालय या ठिकाणी पोचवणे शक्य असल्यास तेथे पोचवावा.
२. ‘सनातन शॉप’, या संकेतस्थळावर सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून जिज्ञासूंना ग्रंथ घरपोच मिळण्यासाठी मागणी करता येईल.
३. एखादा जिज्ञासू बाहेरगावाहून आलेला असेल, तर तेथील जिल्ह्याच्या / राज्याच्या वितरकांचा संपर्क क्रमांक त्याला द्यावा. हे संपर्क क्रमांक ‘सनातन शॉप’वर ठेवलेले आहेत. शॉपच्या वेबसाईट वरील ‘Contact us’ मध्ये याची सूची मिळेल, तसेच त्या जिज्ञासूचा संपर्क क्रमांक घेऊन संबंधित वितरकास देता येईल.
४. साधकांनी ‘जिज्ञासूला ग्रंथ मिळाला आहे ना ?’, याची निश्चिती करावी.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आपत्काळात जिज्ञासूंना ‘साधना, राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, दिनचर्या, व्यक्तीमत्त्व विकास’ इत्यादी विविध विषयांवरील ग्रंथ ‘साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य’, यांमध्ये पुढील टप्पा गाठण्यासाठी साहाय्य करू शकतात’, हे लक्षात घेऊन साधकांनी जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी तळमळीने शक्य ते प्रयत्न करावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.७.२०२५)
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !