पुढे घराघरांत लोक तुला पूजतील’, या प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच महर्षींनीही सांगणे आणि त्याची मिळत असलेली प्रचीती

‘पुढे घराघरांतील देवघरात तुझी प्रतिमा असेल’, असे प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले होते. चेन्नई येथे झालेल्या एका नाडीपट्टीवाचनात महर्षींनीही हेच सांगितले, ‘पुढे पुढे आम्ही या अवताराचे रहस्य उलगडणार आहोत. येणार्‍या काळात अनेक भक्तांद्वारे त्यांचे पूजन होईल. या परम गुरुजींचे चरण सोडू नका. यांच्या नेहमी कृपादृष्टीत रहा. याव्यतिरिक्त जीवनात आणखी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.’

प.पू. बाबांचा आशीर्वाद, तसेच महर्षींनी वर्तवलेली ही वाणी आता सत्यात उतरतांना दिसत आहे.

(‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी एक शिष्या कु. सीमा गरुड यांना सांगितले, ‘‘लोक याला (डॉक्टरांना) पूजतील !’’ – संकलक)

 

ज्यांना परात्पर गुरु डॉक्टर कोण आहेत ?,
हे ठाऊक नाही, अशांनीही परात्पर गुरु डॉक्टरांचे
छायाचित्र दाखवल्यानंतर ‘आम्हालाही असे एखादे छायाचित्र द्या’, असे म्हणणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

सनातनच्या साधकांच्या देवघरात परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहेच. याचबरोबर अनेक हिंदुत्वनिष्ठही परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र खिशात ठेवण्यासाठी, तसेच स्वतःच्या बॅगेत ठेवण्यासाठी मागून घेत आहेत. ज्यांना परात्पर गुरु डॉक्टर कोण आहेत ? हे ठाऊक नाही, अशांना प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यानंतर ‘आम्हालाही असे एखादे छायाचित्र द्या’, असे ते म्हणत आहेत. अशी अनुभूती आम्हाला इतरत्र प्रवास करतांना अनेक वेळा आली आहे.

संकलक : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

अनेक संतांनीही त्यांच्या देवघरात परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पूजेसाठी ठेवणे

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र मागून घेणे

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

प.पू. आबांनी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र मागितले होते. त्यांना आम्ही दोन छायाचित्रे दिली. ‘यांतील कुठले आवडेल, ते ठेवून घ्या’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोपही त्यांना सांगितला. या दोन्ही छायाचित्रांना पाहून प.पू. आबा म्हणाले, ‘‘ही दोन्हीही छायाचित्रे छान आहेत. यातील एक मी माझ्याजवळ ठेवतो आणि एक देवघरात ठेवतो.’’

 

पुणे येथील एका नाडीकेंद्रातही
परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असणे आणि तेथील
नाडीवाचक श्री. मुदलीयार यांनी प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे

श्री. मुदलीयार

पुणे येथील नाडीवाचक श्री. मुदलीयार यांच्याकडेही परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे. अगस्ती महर्षींच्या चित्रासमवेत त्यांनी ते त्यांच्या देवघरात ठेवले आहे. ते म्हणतात, ‘मी प्रतिदिन गुरुजींना, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनाही प्रार्थना करतो आणि मला येत असणार्‍या अडचणी निवेदन करतो.’

 

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील
अश्वमेधयाजी प.पू. नाना (नारायण) काळेगुरुजी यांनी
परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समोर ठेवूनच यज्ञाला प्रारंभ करणे

प.पू. नाना (नारायण) काळेगुरुजी

अश्वमेधयाजी प.पू. नाना (नारायण) काळे यज्ञ करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समोर ठेवून यज्ञाला बसत असत. ते म्हणतात, ‘परात्पर गुरु डॉक्टरांविना काही होऊ शकत नाही. त्यांचा आम्हाला पुष्कळ आधार वाटतो. प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन केली, तर ती लगेच सुटते. प्रत्येक गोष्ट आपण देवाला सांगतो, तसेच हे आहे.’

 

सूर्यकला नाडीचे वाचक श्री. सेल्वराजू यांना
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्याची माहिती नाडीपट्टीत
मिळाल्याने त्यांनी ‘अशा दिव्यात्म्याचे छायाचित्र आम्हाला द्या’, अशी मागणी करणे

श्री. सेल्वराजू

तमिळनाडू येथील वैदिश्वरन् गावातील सूर्यकला नाडीचे वाचक श्री. सेल्वराजू यांनीही परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र देवघरात ठेवले आहे. सूर्यकला नाडीत ज्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी माहिती मिळाली, त्या वेळी त्यांनी उत्सुकतेने परात्पर गुरु डॉक्टर कोण आहेत ? हे जाणून घेतले आणि ‘अशा महान दिव्यात्म्याचे छायाचित्र आम्हाला द्या’, असे सांगून ते मागून घेतले.

 

‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष श्रीराम आहेत’, असा भाव ठेवून
प.पू. दास महाराज यांनी त्यांच्या देवघरात परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवणे

प.पू. दास महाराज

बांद्याचे संत प.पू. दास महाराज यांच्या देवघरात त्यांचे गुरु प.पू. श्रीधरस्वामी यांच्या छायाचित्राजवळ परात्पर गुरु डॉक्टरांचेही छायाचित्र आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष श्रीराम आहेत आणि त्यांच्या अवतारी लीलेमुळेच पृथ्वीवर रामराज्य येणार आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे.

 

नोव्हेंबर २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर
असलेला सनातनचा ग्रंथ पाहून ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनीलजी चिंचोलकर भावविभोर झाले.


‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा कि बुडवावा, धर्मसंस्थापना कारणे ।।’

असे म्हणत पू. चिंचोलकर यांनी खरेच तो ग्रंथ मस्तकावर धरला.

वरील सर्व उदाहरणांतून असे दिसून येते की, हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्‍याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो. खरंच, अवतारी कार्य करणार्‍या देहाचे चैतन्य लपवून ठेवता येत नाही. वेळ आली की, ते जनसामान्यांनाही आपला प्रभाव दाखवते. आता आपण त्या चैतन्याची जनसामान्यातील किमया अनुभवू शकतो.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment