उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. जयतीर्थ आचार्या

‘श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. ‘राघवेंद्र स्वामी उडुपी मठा’चे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. ९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली. त्या वेळी मी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले. ते पाहून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टर अलौकिक आहेत.

२. त्यांच्याकडे अनेक दैवी शक्ती आहेत.

३. परात्पर गुरु डॉक्टरांचे कान पुष्कळ लांब आहेत आणि कपाळ रूंद आहे, हे ‘महापुरुष’ असल्याचे लक्षण आहे.

४. ‘भगवान श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ यांच्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर अवतारी आहेत.

५. परात्पर गुरु डॉक्टर ‘अजानुबाहू’ आहेत. याचा एक अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीचे दोन्ही हात गुडघ्यापर्यंत लांब आहे. तिला ‘अजानुबाहू’, असे म्हणतात. या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की, ज्या व्यक्तीचे हात, पाय, कपाळ, नाक आणि शरीर रूंद आहे. तिलाही ‘अजानुबाहू’, असे म्हणतात. या अर्थाने परात्पर गुरु डॉक्टर ‘अजानुबाहू’ आहेत.

६. परात्पर गुरु डॉक्टरांसारखे व्यक्तीत्व पृथ्वीवर विरळ असेल किंवा कदाचित् नसेल; कारण भगवान परशुरामाने लयाचे कार्य केले होते, त्याप्रमाणे  कलियुगात सध्या परात्पर गुरु डॉक्टरांकडून हे कार्य काही प्रमाणात होणार आहे.’ त्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणाम !’

– श्री. सोमनाथ मल्ल्या, उडुपी, कर्नाटक. (१०.४.२०२३)

 

ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे कार्य घडण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्याकडे आशीर्वाद मागणे आणि त्यावर श्री. जयतीर्थ यांनी दिलेले विनम्रतापूर्वक उत्तर !

‘९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून त्यांची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगितली. हे वाचून परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री. जयतीर्थ यांना पुढील निरोप देण्यास सांगितला, ‘उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांना माझा नमस्कार सांगणे आणि असेही सांगणे की, त्यांच्या भविष्याप्रमाणे माझ्याकडून कार्य होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद असावा.’

हा निरोप मी श्री. जयतीर्थ यांना दिला. त्या वेळी त्यांनी मला परात्पर गुरु डॉक्टरांना उद्देशून पुढील निरोप दिला, ‘मी एक विद्यार्थी आहे. मी परात्पर गुरु डॉक्टरांना आशीर्वाद काय देणार ? आपणच मला आशीर्वाद द्यावा. मला पुढे भविष्यात समष्टीसाठी काही उपयोगी सूत्रे सुचल्यास मी आपल्याला देत जाईन.’

– श्री. सोमनाथ मल्ल्या, उडुपी, कर्नाटक. (१३.४.२०२३)

Leave a Comment