परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे आज ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली.

कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे १२७ वे (व्‍यष्‍टी) संत पू. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) यांची त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्‍यांचा सन्‍मान केला.

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

नवरात्रीच्या काळात सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येत आहेत ‘दशमहाविद्या याग’ !

सनातन संस्थेच्या आश्रमात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या दिवसांमध्ये ‘दशमहाविद्या यज्ञ’ करण्यात येत आहेत. १५ ऑक्टोबर या दिवशी ‘कालीयाग’ आणि १६ ऑक्टोबरला ‘तारायाग’ पार पडला.

प्रीती, परिपूर्ण सेवा करणे आदी विविध गुणांचा समुच्चय असलेले कर्णावती (गुजरात) येथील श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

ईश्‍वराच्या सतत अनुसंधानात असणारे बडोदा येथील सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) हे सनातनच्या १२७ व्या संतपदी विराजमान झाले.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याचा भाववृत्तांत !

सातत्‍य, चिकाटी आणि श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्‍या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान !

देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्‍या रहात्‍या घरी सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांना व्‍यष्‍टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – ३

वर्ष १९८९ मध्‍ये माझी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांशी भेट झाली. आरंभी त्‍यांना भेटतांना माझे वैयक्‍तिक प्रश्‍न सुटण्‍यावरच माझा भर होता; मात्र त्‍यांनी ‘सर्व प्रश्‍नांवर ‘साधना करणे’, हाच उपाय आहे’, हे माझ्‍या मनावर बिंबवले.

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – २

प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईत येत. तेव्‍हा प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला त्‍यांचा अनमोल सत्‍संग लाभत असे. प.पू. बाबा जे बोलत, तो प्रत्‍येक शब्‍द मी मनात कोरून ठेवून ती अमृतवचने लिहून प.पू. डॉक्‍टरांकडे देत असे