गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता !

छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत.

समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत.

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा. त्रैलोक्यात सद्गुरुच श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाविना कोणतेही कार्य होऊच शकणार नाही. श्रीरामाच्या आशीर्वादाविना सीतेचा शोध घेणे किंवा लंकेत जाणे शक्य नव्हते. शेवटी काय, ईश्‍वर हाच सद्गुरु अन् सद्गुरु हाच ईश्‍वर !

गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !

धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.

गुरु, सद्गुरु आणि परात्परगुरु

प्रस्तुत लेखात आपण प्रत्येक प्रकारच्या गुरूंची व्याख्या आणि अर्थ, आध्यात्मिक पातळी (टक्के), त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांचे कार्य, शब्द आणि शब्दातीत शिकवणे यांविषयीची तुलनात्मक माहिती सारणींच्या माध्यमातून पाहू.

मनुष्यजीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्प बनू शकते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य ईश्वराला प्राप्त करू शकतात; पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते.

गुरुमंत्र

गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला, तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते. ह्या लेखात आपण गुरुमंत्रा विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.