‘मनाला दिलेल्या सकारात्मक सूचना या भावाप्रमाणे कार्य करतात !

Article also available in :

‘भाव तेथे देव’ असे आपण म्हणतो. मनाला सकारात्मक सूचना दिल्यामुळे मन सकारात्मक होते. ‘मन पूर्णतः सकारात्मक असणे’, हा एक प्रकारे देवाप्रतीचा सकारात्मक भावच झाला. यामुळे मन आणि अंतर्मन यांतील विचार पालटतात, तसेच आपल्याभोवतीचे नकारात्मक आवरण नष्ट होऊन सकारात्मकता वाढते. त्यामुळे साधनेचे प्रयत्न करणे, तसेच प्रसंगावर मात करणे यांसाठी उत्साह येतो. त्यामुळे मन स्थिर आणि शांत, तसेच आनंदी होते. सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या सकारात्मक सूचनांपैकी काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

सू्चना कश्या घ्याव्यात याविषयी अधिक माहिती जाणून घ्या – व्यक्तिमत्त्व विकास 

सद्गुरु राजेंद्र शिंदे

भावनिर्मितीसाठी सूचना

१. देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.

२. देवाच्या कृपेने मी भूतकाळातील सर्व घटना विसरलो आहे. आता मी वर्तमानात राहून आनंद अनुभवत आहे.

३. देवाच्या कृपेने माझ्यात क्षमता, ऊर्जा, उत्साह, बळ, जिद्द आणि चिकाटी आहे.

४. देवाच्या कृपेने मी जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करतो.

५. समर्पण केल्यामुळे माझी चिंता मिटली आहे आणि मी देवाच्या कृपेने चिंतामुक्त झालो आहे.

ईश्वर आणि ईश्वरी शक्ती यांवरील श्रद्धा वाढण्यासाठी सूचना

१. देवाच्या कृपेने माझ्यात सुप्त अशी ईश्वरी शक्ती वास करत आहे.

२. मी सर्वशक्तीमान परमेश्वराचा अंश आहे.

३. ईश्वर माझ्यात आहे आणि मी ईश्वरामध्ये आहे.

४. नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक विचार करणे, सकारात्मकता शोधणे, ‘देव माझ्या भल्यासाठी करतोय’, हा भाव ठेवणे, हे मला श्रीविष्णूच्या कृपेनेच जमू लागले आहे.

५. मी सतत निश्चिंत रहातो; कारण माझा भार श्रीविष्णूच्या चरणी सोपवला आहे. तो माझी सगळी काळजी घेणारच आहे !

६. मी स्वतःला ईश्वराच्या विराट स्वरूपासमोर समर्पित केले आहे.

७. मी त्या विराट सर्वशक्तीमान ईश्वराला साष्टांग नमस्कार करतो.

८. नमस्कार केल्याने देवाच्या कृपेने माझा ‘मी’पणा नष्ट होत आहे.

 

देवाच्या कृपेने आता केवळ एकच जाणीव माझ्यात निर्माण झाली आहे,

‘मी तुमचा आहे ! हे जगत्पिता, मी तुमचा आहे !

हे अनादी अनंता, मी तुमचा आहे !

हे दयाघना, मी तुमचा आहे !

हे सच्चिदानंदा, मी तुमचा आहे !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment