कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजारांचा विळखा !

कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या संसर्गामुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यांमध्ये भर पडली आहे.

‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर होणार संशोधन !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ? यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

देशात कोरोनामुळे मागील १४ दिवसांमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘कोविड ट्रॅकर’नुसार देशात सध्या प्रतिदिन साधारणतः ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू होत आहे. ४ आठवड्यांआधी ही संख्या ७८७ च्या जवळपास होती. कोविड ट्रॅकरनुसार भारतात मागील १४ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ८२ टक्के वाढ झाली आहे.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सूत्रांचा स्वीकार करा ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्‍लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे.

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

सध्या विविध ठिकाणी ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मानवाला किती आवश्यकता आहे आणि त्याचे मूल्य, हेच यातून दिसून येते. भविष्यात विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षणासाठी आता चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल ! – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये, म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये (भाद्रपद मासात) कोरोनाची तिसरी लाट येईल, असे मत महाराष्ट्र राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी चेतावणी आरोग्य तज्ञांनी २८ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात दिली.

मुंबई येथील उच्चपदस्थ शहा यांनी स्वीकारले जैन मुनीत्व !

बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

भारत कोविड-१९ च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.