अमरावती येथील सनातनच्या साधिका सौ. मनीषा पोहनकर ‘आचार्य’ पदाने सन्मानित !

अमरावती येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा गजानन पोहनकर यांना गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती यांनी नुकतेच आचार्य पदवी देऊन सन्मानित केले. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र आणि समाजप्रबोधनपर निवडक गीतांचे सांगीतिक अध्ययन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

समीर गायकवाड अटकेप्रकरणी माहिती देणारे पोलीस अधिकारी संजय कुमार हे श्री तुळजाभवानी मंदिर घोटाळ्याप्रकरणी गप्प का राहिले ? – सनातन संस्था

….यातून त्यांनी समाजवाद्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न श्री तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्याविषयी केला असता, तर पाच वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात मोठी जनजागृती होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली असती, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

ट्विटरवर ‘Paratpar Guru’ हा ट्रेंड दिवसभर उच्चस्थानी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी सकाळपासून #HinduEktaDindi या हॅशटॅगने आणि ‘Paratpar Guru’ अन् ‘परात्पर गुरु’ या ‘की-वर्ड्स’ने ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला.

यवतमाळ येथे दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

हिंदु जनजागृती समिती आयोजित दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन नुकतेच पार पडले. संवैधानिक मार्गाने कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार शहरासह वणी, पुसद, उमरखेड, घाटंजी, कारंजा येथील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या देखाव्याला उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त !

अमरावती येथे झालेल्या परशुराम जयंती शोभायात्रेनंतर पारितोषिक वितरण !

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन !

या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी प.पू. जीजी, पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि भक्त श्री. शशीकांत ठुसेकाका यांच्या हस्ते ‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे समाजजीवन अस्थिर झाले आहे.

जयपूर, राजस्थान येथील शिवभक्त पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांचा देहत्याग

पू. वीरेंद्र सोनी हे घरी राहूनच भाव-भक्तीने साधना करत. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन करून त्यांना आतून ईश्वराकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांची भगवान शिवावर अचल श्रद्धा होती.