हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे’’, असे मार्गदर्शन सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

हिंदुत्‍वनिष्‍ठांना खोट्या आरोपांमध्‍ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात धिक्‍कार !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही सनातनवर होणार्‍या आरोपांचे खंडण केले. ‘हिंदुत्‍वनिष्‍ठांवर नाहक होणार्‍या आरोपांना यापुढे वैध मार्गाने परंतु परखडपणे प्रत्‍युत्तर दिले जाईल’, असा निर्धार या वेळी उपस्‍थितांनी केला. उत्‍स्‍फुर्तपणे विविध जयघोष देऊन हिंदुत्‍वनिष्‍ठांना समर्थन दिले.

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्‍थेविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

सनातन संस्थेशी जोडलो गेल्यावर ‘आम्ही आमच्या मातृसंस्थेत आलो आहोत’, असे वाटले. येथे आमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद़्घोष करणा-या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या एकमात्र संघटना आहेत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला उत्‍साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

श्री रामनाथ देवस्‍थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्‍साही वातावरणात प्रारंभ झाला. हे अधिवेशन १८ जून पर्यंत चालणार असून विविध राज्‍यांतील ४५० प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्‍थित आहेत.

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रथम मांडणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी आज दि. १२ जून २०२२ या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित ‘हिंदु जनजागृती समिती’ द्वारा आयोजित दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी दिलेला स्फूर्तीदायी संदेश !

सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८० टक्के गुण !

सनातनच्या आश्रमात रहाणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के (६०० पैकी ४८२) गुण मिळाले आहेत. ती मिरज येथील ‘ज्युबिली ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थिनी आहे.

आक्रमकांच्या कह्यातील मंदिरे सोडवण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१ सहस्र ५६० हिंदु मंदिरांचा प्रश्न आहे. आजही काही प्राचीन मंदिरांवरील अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. यासंदर्भात काही अधिवक्ते आणि संघटना यांनी न्यायालयीन लढा आरंभला असून आक्रमकांच्या कह्यातील प्रत्येक मंदिर सोडवण्यासाठी सिद्ध व्हा !

साधकांना भरभरून चैतन्य देणाऱ्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ (छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५) या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दिव्य जीवनचरित्र उलगडणारा सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या छायाचित्रमय ग्रंथाचे प्रकाशन २५ मे या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

अमरावती येथील सनातनच्या साधिका सौ. मनीषा पोहनकर ‘आचार्य’ पदाने सन्मानित !

अमरावती येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा गजानन पोहनकर यांना गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती यांनी नुकतेच आचार्य पदवी देऊन सन्मानित केले. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र आणि समाजप्रबोधनपर निवडक गीतांचे सांगीतिक अध्ययन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.