सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून पू. भागिरथी महाराज, श्री. सुनील घनवट आणि पू. अशोक पात्रीकर

नागपूर – हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित एक दिवसीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र्र अधिवेशना’त ते बोलत होते. यात १० हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला.

अधिवेशनाला सनातनचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनीही संबोधित केले. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अधिवेशनासाठी पाठवलेला संदेश या वेळी वाचून दाखवण्यात आला.

ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रार्थना करा ! – पू. अशोक पात्रीकर
आपण वैयक्तिक जीवनात देवाकडे काहीतरी मागतच असतो. ज्यांना ‘ईश्वरी राज्य यावे’, असे वाटत असेल, त्यांनी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रतिदिन देवाला प्रार्थना करायला हवी.

मनोगत

१. श्री. वामनराव जोशी, वाचक, नागपूर : या कार्याशी जोडून रहायचे असेल, तर दिशादर्शन करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचले पाहिजे.

२. श्री. सुदर्शन सोनेवाने, गोंदिया : अधिवेशनामुळे देशभरात जाऊन कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

३. श्री. अभय खडबडे, युवा धर्मप्रेमी, गोंदिया : आमच्यासारख्या तरुणांना खर्‍या अर्थाने अध्यात्म आणि संत यांची ओळख झाली.

Leave a Comment