समीर गायकवाड अटकेप्रकरणी माहिती देणारे पोलीस अधिकारी संजय कुमार हे श्री तुळजाभवानी मंदिर घोटाळ्याप्रकरणी गप्प का राहिले ? – सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविषयीचा चौकशी अहवाल अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी 20 सप्टेंबर 2017 रोजी मंत्रालयात गृह विभागाला सादर केला; मात्र या संवेदनशील विषयाची माहिती समाजाला देऊन जनतेला अवगत केले नाही. दुसरीकडे कोल्हापूर येथील पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड यांना ज्या वेळी अटक करण्यात आली. तेव्हा त्याविषयीची माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी संजय कुमार हे पुण्याहून कोल्हापुरला आले. त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्या विषयी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती सांगितली. यातून त्यांनी समाजवाद्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न श्री तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्याविषयी केला असता, तर पाच वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात मोठी जनजागृती होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली असती, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

Leave a Comment