अमरावती येथे ‘हिंदू एकता दिंडी’ उत्साहात पार पडली !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत अंबानगरी अमरावती येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले. शक्तीपीठ काली माता मंदिराचे पिठाधीश्वर पू. श्री शक्ती महाराज, ह.भ.प. पातशे महाराज, प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदीया यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
