वैष्णव आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या वेळी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संतांचे स्वागत !

प्रयागराज कुंभमेळ्यात घुमला ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष !

‘दिगंबर’, ‘निर्वाणी’ आणि ‘निर्मोही’ या वैष्णव आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या वेळी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संतांचे स्वागत !

आखाड्यांच्या बाहेर कापडी फलक घेऊन आखाड्यांतील महात्म्यांचे स्वागत करतांना सनातन संस्थेचे साधक

प्रयागराज (कुंभनगरी) – ५ जानेवारी या दिवशी कुंभमेळाक्षेत्री श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच रामान्दीय निर्वाणी आखाडा आणि श्री पंच रामान्दीय निर्मोही आखाडा या ३ प्रमुख वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण भावपूर्ण अन् उत्साहात पार पडले. या वेळी आखाड्यात येणारे संत, महात्मा, साधू आणि भाविक यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हातात फलक धरून भावपूर्ण स्वागत करण्यात आले. या वेळी ‘प्रभु श्रीरामचंद्रकी जय’, ‘बजरंग बली हनुमानकी जय’ या घोषणांसह ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’च्या घोषणांनी उद्घोष करण्यात आला. या वेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमस्कार करून अनुमोदन दिले. या वेळी आलेल्या काही भाविकांनीही त्याला प्रतिसाद देत घोषणा दिल्या.

या ध्वजारोहण कार्यक्रमाला उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज, श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री महंत रामकिशनदासजी महाराज, श्री वैष्णोदासजी महाराज, श्री महंत धमरदासजी महाराज आणि अन्य प्रमुख संत-महात्मे उपस्थित होते. त्याचसमवेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि उत्तर अन् पश्‍चिम प्रसारसेवक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर अन् पूर्व मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस अन् हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, राज्यस्थान अन् मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजता ध्वजारोहणाला प्रारंभ झाला. वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण झाल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बाजूला असणार्‍या ‘श्री पंच दशनाम आवाहन आखाडा’ या शैव आखाड्यांमध्ये भेटीसाठी गेले. त्या ठिकाणीही जाऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या साधक अन् कार्यकर्ते यांनी हातात फलक धरून संत अन् भाविक याांचे स्वागत केले. तसेच उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

(विशेष प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment