‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते संपन्न

संकेतस्थळाचे अनावरण करतांना पू. पृथ्वीराज हजारे

रामनाथी (गोवा) – गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी, म्हणजेच २७ जुलै या दिवशी सनातन-निर्मित ग्रंथांच्या विक्रीचे ‘ऑनलाईन’ संकेतस्थळ ‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले. या वेळी पू. पृथ्वीराज हजारे यांनी ‘टॅब’वर क्लिक करून संकेतस्थळाचे अनावरण केले. या प्रसंगी सनातनच्या साधिका कु. दुर्गा कद्रेकर यांनी या संकेतस्थळाची माहिती उपस्थितांना करून दिली.

 

‘सनातन शॉप’ संकेतस्थळाची माहिती

संकेतस्थळाच्या चित्रात गोलात दाखवलेले गुजराती संकेतस्थळाचे बटन

आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेअभावी ‘ऑनलाईन’ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. प्रत्येकाला एखाद्या ठिकाणी जाऊन ग्रंथ घेणे शक्य होईलच, असे नाही. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले संकलित अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले असे अमूल्य ज्ञान देणारे चैतन्यमयी ग्रंथ जिज्ञासूंना मिळावेत; म्हणून सनातनची ग्रंथसंपदा ‘www.SanatanShop.com’ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. वर्ष २०१२ मध्ये दिवाळीत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवद येथील सनातन आश्रमातील परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. ‘सनातन शॉप’ संकेतस्थळावरून वाचक भारतभरातील कोणत्याही ठिकाणाहून ग्रंथांची ‘ऑनलाईन’ खरेदी करू शकतात. अध्यात्मशास्त्र, साधना, समाज, राष्ट्र, धर्म अशा विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचा लाभ आज या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील लक्षावधी लोकांना होत आहे. वाचकांचा वाढता प्रतिसाद पाहून काही वर्षांतच संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील ग्रंथही उपलब्ध करण्यात आले आणि आता गुजराती भाषेतील ग्रंथांची वाढती मागणी पाहून ‘सनातन शॉप’ संकेतस्थळावर हे ग्रंथसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment