हिंदुत्वाच्या कार्याला साधनेची जोड दिल्यास कार्याची फलनिष्पत्ती अधिक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेद्‍वारे रायगड जिल्ह्यात जिज्ञासूंना मार्गदर्शन

जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावरील प्रवचनातून नवरात्रीतील विविध धार्मिक कृतींचे शास्त्र तसेच, गरब्यामध्ये होणारे अपप्रकार आणि लव्ह जिहादची समस्या यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पुणे येथे सनातन संस्थेच्या आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनकक्षांचे उद्घाटन !

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनाचे कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते उद्घाटन !

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मिरज येथील ब्राह्मणपुरीतील श्री अंबाबाई मंदिराजवळ सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गिरगाव आणि चेंबूर येथे प्रवचन !

नवरात्री निमित्त गिरगाव येथील ‘चित्पावन ब्राह्मण सेवा संघा’च्या कार्यालयात २५ सप्टेंबर या दिवशी आणि चेंबूर येथे ‘बाल विकास सेवा संघा’च्या कार्यालयात २६ सप्टेंबर या दिवशी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ‘श्राद्ध’ विषयावर प्रवचन आणि सामूहिक नामजप !

या वेळी संस्थेच्या वतीने ‘श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध केल्याने पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी कसे साहाय्य होते, तसेच पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी तथा पितृदोष न्यून करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ?’, यांविषयी मार्गदर्शन केले गेले.

देहली येथे सनातन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘शहीद भाई मुकुंद सर्वाेदय विद्यालया’मध्ये ‘विद्यार्थी जीवनात नामजपाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सनातन संस्थेच्या वतीने राजस्थान येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोजत येथील नृसिंहपुरामधील राधा कृष्ण मंदिर, अजमेर येथे पुष्कर रोडवरील खाटू श्याम मंदिर आणि जयपूर येथे चौरा रस्ता भागातील राधा दामोदर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते.

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने कन्नूर आणि एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र ६०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर, खानापूर, येळ्ळूर, रामनगर या ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या तिन्ही महोत्सवांसाठी १ सहस्र ६०० जणांची उपस्थिती होती.