
रायगड – जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावरील प्रवचनातून नवरात्रीतील विविध धार्मिक कृतींचे शास्त्र तसेच, गरब्यामध्ये होणारे अपप्रकार आणि लव्ह जिहादची समस्या यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील महाड, पेण, उरण, तसेच अन्य ठिकाणी एकूण ६४ प्रवचने घेण्यात आली. या प्रवचनांना ७६४ जिज्ञासूंची उपस्थिती लाभली.

प्रवचनाला उपस्थित जिज्ञासूंचे अभिप्राय
सौ. भाग्यश्री गायकवाड – प्रवचनानंतर घराच्या वास्तूमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला. अशा प्रकारचे प्रवचन नियमित आमच्या घरामध्ये घ्या.
सौ. वसुधा उल्हाळकर – प्रवचनातून शास्त्र समजून घेऊन भावपूर्ण पूजा कशी करायची ?, हे लक्षात आले.
सौ. जयश्री जाधव – प्रवचनामधून पुष्कळ आनंदही अनुभवता आला.
सौ. पूनम येवले – धर्मशास्त्राप्रमाणे कृती करण्यासाठी मी स्वतःही प्रयत्न करेन आणि इतरांना सुद्धा सांगेन.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !